Akhilesh Yadav: "तोड दिया हुकूमत का गुरुर.." राहुल गांधींनंतर अखिलेश यादवांची संसदेत फटाकेबाजी, पाहा व्हिडिओ

Akhilesh Yadav's Viral Video Criticizing NDA Government in Parliament: पेपर लीक प्रकरण, अयोध्या, जात जनगणना, एमएसपी, ओपीएस, अग्निवीर योजना अशा अनेक मुद्द्यांवर अखिलेश यांनी भाजप सरकारला धारेवर धरले.
Akhilesh Yadav Viral Video From Lok Sabha
Akhilesh Yadav Viral Video From Lok SabhaEsakal
Updated on

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल सत्ताधाऱ्यांना झोडपून काढल्यानंतर आज कन्नौजचे सपा खासदार अखिलेश यादव यांनी आपल्या भाषणाने लोकसभा गाजवली. त्यांनी संसदेत एनडीएवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, हे सरकार चालणारे नसून पडणार आहे. सरकार जनमर्जीनुसार चालेल, मनमर्जीनुसार नाही.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी सभागृहात बोलताना भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पेपर लीक प्रकरण, अयोध्या, जात जनगणना, एमएसपी, ओपीएस, अग्निवीर योजना अशा अनेक मुद्द्यांवर अखिलेश यांनी भाजप सरकारला धारेवर धरले.

यावेळी अखिलेश यांनी कवितेतूनही भाजपला फटकारले.

यावेळी अखिलेश यादव यांनी सर्वप्रथम लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, सर्वप्रथम मी त्या सर्व मतदारांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी लोकशाहीचे हुकूमशाहीत रूपांतर होण्यापासून रोखले.

ते म्हणाले, "आवाम ने तोड़ दिया हूकुमत का गुमार, दरवार तो लगा है, मगर बड़ा गमगीन बेनूर है और पहली बार ऐसा लग रहा है कि हारी हुई सरकार विराजमान है। जनता कह रही है कि चलने वाली नहीं, यह गिरने वाली सरकार है। क्योंकि ऊपर से जुड़ा कोई तार नहीं, नीचे कोई आधार नहीं, अधर में जो लटकी, वो तो कोई सरकार नहीं|"

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव पुढे म्हणाले, " माझा कालही ईव्हीएमवर विश्वास नव्हता आणि आजही नाही. मला 80 जागा मिळाल्या तरी माझा विश्वास बसणार नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकल्यानंतर ईव्हीएम हटवण्याचे काम करेन, असे मी निवडणुकीत म्हटले होते. ईव्हीएमचा प्रश्न संपलेला नाही आणि संपणार नाही. ईव्हीएम हटवत नाही तोपर्यंत आम्ही यावर ठाम राहू."

ते अग्निवारच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, "कोणत्याही देशाचे सर्वात मोठे प्राधान्य देशाच्या सीमांची सुरक्षा असते. अग्निवीरसारख्या यंत्रणांना ते शक्य नाही. आपण अग्निवीर योजनेला कधीच स्वीकारू शकत नाही. आम्ही सत्तेत आल्यावर अग्निवीर योजना बंद करू."

नीट पेपर फुटीवर बोलताना अखिलेश यादव म्हणाले, " या सरकारची गेल्या 10 वर्षांची एकमेव उपलब्धी म्हणजे परीक्षा माफियाचा जन्म. यूपीमध्ये सर्व पेपर लीक झाले आहेत. इतर राज्यांतही असेच घडले. नीटचा पेपरही लीक झाला. आता प्रश्न पडतो की सगळे पेपर लीक कसे होतात. सत्य हे आहे की सरकारला नोकऱ्या द्यायला नकोत, म्हणूनच ते असे करत आहे. सरकार हे आशेचे प्रतीक असले पाहिजे निराशेचे नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.