Akshay Kumar New Movie:सध्या देशाच्या नावावरुन देशभरात वाद सुरु आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी नेत्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं. यावेळी परदेशी नेत्यांना पाठवण्यात आलेल्या अधिकारिक आमंत्रणपत्रिका पाठवली. या पत्रिकेत 'इंडिया'ऐवजी 'भारत'असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर या गोष्टीवरुन 'इंडिया'विरुद्ध 'भारत'असे संघर्षचित्र उभे राहिले. अशातच, बॉलिवुडचा अभिनेता अक्षय कुमार याने देखील चित्रपटाच्या पोस्टरच्या माध्यमातून 'भारत'नावाला समर्थन दिले आहे.
अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज'हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पुर्वी अक्षय कुमारने आपल्या चित्रपटाच्या नावात बदल केला आहे. अक्षयने आधी लाँच केलेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचं नाव 'मिशन राणीगंज:द ग्रेट इंडियान रेस्क्यू'असे ठेवण्यात आले होते. मात्र, 'इंडिया' आणि 'भारत'चा वाद सुरु झाल्यावर अक्षयने आपल्या चित्रपटाच्या नावात बदल केला. अक्षयने शेअर केलेल्या नविन पोस्टरमध्ये चित्रपटाचं नाव 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू'असे केले आहे.
अक्षयने बुधवारी (दि.६ सप्टेंबर) इंस्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून स्वर्गीय श्री जसवंत सिंह गिल यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या लहान मुलांचा जीव वाचवला होता.
मिशन राणीगंजचे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केले असून वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(Latest Marathi News)
अक्षयच्या पुढच्या नावाच्या बदलामुळे विरोधकांच्या दाव्यात आणखीनच खळबळ उडाली आहे की, देशाचे नाव 'इंडिया' वरून 'भारत' करण्यासाठी 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात औपचारिकपणे प्रस्ताव मांडण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.