Akshay Shinde Encounter: इकडे अक्षय शिंदेचा एनकाउंटर अन् तिकडे प्रियंका गांधींची 13 हजार एनकाउंटरबाबतची पोस्ट व्हायरल

Priyanka Gandi On Encounter: अशात आता प्रियंका गांधी यांची एक एक्स पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी 13 हजार एनकाउंटरवर भाष्य केले आहे.
Akshay Shinde Encounter
Akshay Shinde EncounterEsakal
Updated on

महाराष्ट्रातील बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. सुरुवातीला त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे समोर आले होते. नंतर तो पोलीस चकमकीत ठार झाल्याची बातमी समोर आली आहे.

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

अशात आता प्रियंका गांधी यांची एक एक्स पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी 13 हजार एनकाउंटरवर भाष्य केले आहे.

काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

आपल्या एक्स पोस्टमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या, "खून, हिंसाचार, रक्तपात आणि एखाद्याचा जीव हिरवण्याचा राजकीय कायदा, बुलडोझर शिक्षेचा संविधान आणि न्याय यांच्याशी काहीही संबंध नाही. राजकीय वर्चस्वाच्या कृत्यांना कायदा आणि सुव्यवस्था म्हणणे म्हणजे राज्यघटनेचा अपमान आहे."

प्रियंका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "कायदा व सुव्यवस्थेचा पाया समाजात शांतता प्रस्थापित करणे, गुन्हेगाराला शिक्षा करून त्याच्या सुधारणेसाठी आणि प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याची संधी देणे यावर आधारित आहे. अपवाद वगळता, न्यायालयाच्या आदेशाशिवाय घेतलेला प्रत्येक जीव फक्त खून आहे."

"बातम्यामंध्ये आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सात वर्षांत यूपीमध्ये झालेल्या सुमारे 13,000 चकमकींमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे का? गुन्हे थांबत नाहीत. मग त्याचा उद्देश काय? हा खेळ का खेळला जात आहे? हे असंवैधानिक काम थांबवावं आणि ज्या सर्व चकमकींवर प्रश्नचिन्ह आणि संशय आहे, त्यांची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे," असे प्रियंका गांधी यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात १३ ऑगस्ट २०२४ रोजी एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती.

यामध्ये सफाई कामगार अक्षय शिंदे याच्यावर दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

यातील एका मुलीने सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर परिसरातील हजारो पालकांनी रस्त्यावर उतरत आरोपीवर कारवाई करण्यासाठी आंदोलन केले होते.

Akshay Shinde Encounter
Akshay Shinde: त्याला साधी होळीची पिचकारी बंद करता येत नाही, तो गोळी कशी झाडेल? अक्षयच्या बापाने हंबरडा फोडला

काल काय घडलं?

आरोपी अक्षय शिंदेला सोमवारी (23 सप्टेंबर 2024) कोठडीसाठी नेण्यात येत होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बदलापूर पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. यादरम्यान अचानक अक्षय शिंदे याने जीपमध्ये बसलेल्या इन्स्पेक्टरचे रिव्हॉल्व्हर हिसकावले आणि पोलिसांवर गोळीबार केला. मुंब्रा बायपासजवळ ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याने तीन राऊंड फायर केले. लगेच पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने प्रत्युत्तर देत त्याच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Akshay Shinde Encounter
Akshay Shinde Encounter: कोण आहे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारा ऑफिसर... प्रदीप शर्मांसोबत केलं आहे काम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.