Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिर उद्धस्त करुन, त्या जागी पुन्हा बाबरी मशीद बांधणार; अल कायदाची थेट धमकी

भारतीय मुस्लिमांना जिहादला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Ayodhya-Ram-Temple
Ayodhya-Ram-Templeesakal
Updated on
Summary

जिहादी फीडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गरळ ओखायला सुरुवात केलीये.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरावर (Ayodhya Ram Temple) दहशतवाद्यांचा डोळा आहे. गजवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात आंतरराष्ट्रीय जिहादी गटानं शपथ घेऊन सांगितलंय की, 'अल कायदा राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधेल.'

याशिवाय, जिहादी फीडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गरळ ओखायला सुरुवात केलीये. यासोबतच भारतीय मुस्लिमांना (Indian Muslims) जिहादला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Ayodhya-Ram-Temple
Yogi Adityanath : CM योगींच्या भगव्या कपड्यांवर काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान; म्हणाले, आता थोडं मॉर्डन..

मीडिया रिपोर्ट्सनुसार 110 पानांच्या अंकात म्हटलंय की, 'ज्या प्रकारे बाबरी मशिदीच्या (Babri Masjid) रचनेवर राम मंदिर बांधलं जात आहे, ते पाडलं जाईल आणि मूर्तींऐवजी अल्लाहच्या नावावर पुन्हा बाबरी मशीद बांधण्यात येईल. मासिकातील हा मजकूर भारतीय वातावरणाशी परिचित असलेल्या व्यक्तीनं लिहिलेला दिसतोय.

Ayodhya-Ram-Temple
Russia-Ukraine युध्दाबाबत मोठी बातमी! व्लादिमीर पुतीन युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार, पण 'ही' घातली अट

मुस्लिमांनी हानीला घाबरू नये - अल कायदा

अल कायदानं (Al Qaeda) भारतीय मुस्लिमांना उद्देशून म्हटलंय की, मुस्लिमांनी कोणत्याही भौतिक नुकसानास घाबरू नये. विष पसरवणाऱ्या दहशतवादी संघटनेनं भारतीय मुस्लिमांसाठी धर्मनिरपेक्षतेचं वर्णन 'नरक' केलंय, तर हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचे नारे फक्त फसवणुकीसाठी आहेत, असं म्हटलंय. बाबरी मशीद 30 वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. तर, 20 वर्षांपूर्वी गुजरातमधील अहमदाबादमध्ये गर्भवती महिलांसह त्यांच्या मुलांचा शिरच्छेद करून त्यांना जाळण्यात आलं आणि आज सर्वत्र बुलडोझर चालवत आहेत. सर्व हिंदूंना लाठी वापरण्यास शिकवलं जात आहे, असंही अल कायदानं नमूद केलंय.

Ayodhya-Ram-Temple
द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.