नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु असून २२ जानेवारी रोजी इथं रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जावा असं आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. यापार्श्वभूमीवर आता याच दिवशी काही भाजपशासित राज्यांमध्ये संपूर्ण दिवस 'ड्राय डे' असणार आहे. (Alcohol Ban On 22 January Ram Mandir Consecration Day In BJP States)
'ड्राय डे' काय असतो?
ड्राय डे म्हणजे असा दिवस असतो ज्या दिवशी दारुबंदी असते. भारतात अनेकदा काही विशिष्ट दिनी अशा प्रकारे ड्राय डे घोषित केला जातो. त्या संबंधित दिवसाचं पावित्र राखण्यासाठी म्हणून ही घोषणा केली जाते. त्यामुळं ज्या दिवशी ड्रा डे घोषित केला जातो त्या दिवशी दारुची दुकानं, बिअर शॉपी बंद असतात तसेच पब्ज आणि रेस्तराँमध्येही मद्ययुक्त पेये सर्व्ह केली जात नाहीत. (Latest Marathi News)
'या' राज्यांनी जाहीर केलाय ड्राय डे
छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे. या राज्यानं पहिल्यांदा २२ जानेवारी रोजी राज्यात ड्राय डे घोषित केला आहे. मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी गेल्या आठवड्यातच ही घोषणा केली होती.
आसाम : आसाममध्ये देखील सध्या भाजपची सत्ता असून मुख्यमंत्री हिमंताबिस्व शर्मा आणि पर्यटन मंत्री जयंत मल्ला बरुह यांनी रविवारी घोषणा केली की, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी २२ जानेवारीला आसाममध्ये 'ड्राय डे' असेल.
उत्तर प्रदेश : त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील राज्यात २२ जानेवारी रोजी ड्राय डेची घोषणा केली आहे. तसेच हा दिवस राष्ट्रीय सण असल्यासारखा साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच २२ जानेवारीला राज्यात सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.