Alipur Fire Incident : पेंट फॅक्टरीला भीषण आग; 11 कामगारांचा होरपळून मृत्यू, चारजण जखमी

दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला.
Alipur Fire Incident
Alipur Fire Incidentesakal
Updated on
Summary

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 22 अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

Alipur Fire Incident : दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर चारजण जखमी झालेत. उत्तर दिल्लीच्या अलीपूर भागातील दयाल मार्केटमधील एका पेंट फॅक्टरीत (Alipur Fire Incident) ही घटना घडलीये. गुरुवारी सायंकाळी उशिरा मार्केटमध्ये भीषण आग लागली.

रिपोर्टनुसार, आग लागल्यानंतर एकही कामगार कारखान्यातून (Paint and Chemical Godowns) बाहेर पडू शकला नाही. अशा स्थितीत इतर अनेक कामगारांचा या दुर्घटनेत बळी गेला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मृत कामगारांची ओळख अद्याप पटलेली नाहीये.

Alipur Fire Incident
इतिहासाची 57 वर्षांनी पुनरावृत्ती! इंदिरा गांधी यांच्यानंतर कुटुंबाचा 'हा' सदस्य राज्यसभेत जाणार

दिल्लीचे डीसीपी रवी कुमार (DCP Ravi Kumar) यांनी सांगितलं की, रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होतं. ही एक मजली इमारत होती, जिथं पेंट निर्मिती केली जात होती. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीपूरच्या दयाल मार्केटमध्ये लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झालाय, तर चार कामगार जखमी आहेत. घटनास्थळी बचावकार्य अद्यापही सुरू आहे.

Alipur Fire Incident
मोदींच्या राज्यात चाललंय काय? वरातीत घोड्यावर बसला म्हणून दलित नवरदेवाला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 22 अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यात आली. रात्री नऊच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू होतं. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.