अलका लांबा यांची पोलिसांशी बाचाबाची, रडत रडत रस्त्यावर झोपल्या

Alka Lamba riots against Agneepath and ED Enquiry
Alka Lamba riots against Agneepath and ED EnquiryAlka Lamba riots against Agneepath and ED Enquiry
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची ईडी (ED) चौकशी व अग्निपथ योजनेच्या विरोधात अलका लांबा (Alka Lamba) यांचा हाय-व्होल्टेज गोंधळ समोर आला आहे. महिला कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर बसून घोषणाबाजी करणाऱ्या अलका लांबा यांना महिला पोलिसांनी जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गोंधळ घातला. तरुणांची व्यथा सांगत रस्त्यावर झोपून गेल्या. (Alka Lamba riots against Agneepath and ED Enquiry)

अलका लांबा या नवी दिल्लीत काँग्रेसच्या (Congress) महिला कार्यकर्त्यांसोबत रस्त्याच्या मधोमध बसून घोषणा देत होत्या. यावेळी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊ लागली होती. यामुळे पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या हटण्यासाठी तयार नव्हत्या. यामुळे महिला पोलिसांनी लांबा यांना जबरदस्तीने उचलून नेले. यादरम्यान त्यांच्यात बाचाबाचीही झाली.

Alka Lamba riots against Agneepath and ED Enquiry
ठाकरे सरकार अडचणीत असताना नवनीत राणांचा टोला; म्हणाल्या...

हात बांधले आहेत. भारत माता की जय व जय जवान, जय किसान असे म्हणू देत नाही आहे. हे कोणत्या संविधानात लिहिले आहे, असा प्रश्न अलका लांबा यांनी केला. जय जवान, जय किसान, भारत माता की जय, सत्याग्रह असे म्हणत आम्हाला इथे बसायचे आहे.

आम्हाला लोकशाहीचा अधिकार आहे. देशाची अवस्था पाहून देश रडत आहे. मी रडत नाही आहे. माझी जखम उद्या बरी होईल. लोकशाहीत आवाज उठवण्याचा अधिकार आहे की नाही, असा प्रश्नही अलका लांबा (Alka Lamba) यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.