मध्य प्रदेशातील भोपाळमधील एका बेकायदेशीर शेल्टर होममधून २६ मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला होता. शेल्टर होममध्ये गुजरात, झारखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून आलेल्या मुली बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता बालगृहातून बेपत्ता झालेल्या या सर्व 26 मुलींना मध्य प्रदेश पोलिसांनी शनिवारी शोधून काढले.
दरम्यान या प्रकरणात दोन जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना (CDPOs) निलंबित करण्यात आले असून आणखी दोघांना नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदमपूर छावनी परिसरात 10, झोपडपट्टीत 13, टॉप नगरमध्ये दोन आणि रायसेनमध्ये एक मुली आढळून आली.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) चे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी भोपाळच्या जवळ परवालिया भागातील आंचल या मुलींच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली तेव्हा हे प्रकरण गुरुवारी उघडकीस आले होते. शेल्टर होमचे रजिस्टर तपासल्यानंतर कानुंगो यांना आढळले की त्यात 68 मुलींच्या नोंदी होत्या, परंतु त्यापैकी 26 गायब होत्या. या मुली गुजरात, झारखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह विविध राज्यांतील होत्या.
कानुंगो यांच्या म्हणण्यानुसार, बालगृहाचे व्यवस्थापन करणाऱ्या एका मिशनरीनी काही मुलांना रस्त्यावरून ताब्यात घेतले आणि ते कोणत्याही परवान्याशिवाय हे शेल्टर होम चालवत होते. ते पुढे म्हणाले की, या मुलांना लपवून घरात ठेवण्यात आले होते आणि त्यांना ख्रिश्चन धर्माचे पालन करायला लावले होते.
एफआयआर दाखल झाल्यानंतर शनिवारी दोन बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. बृजेंद्र प्रताप सिंग आणि कोमल उपाध्याय या अधिकाऱ्यांना या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात महिला व बालविकास विभागातील अधिकारी सुनील सोलंकी आणि विभागाचे सहायक संचालक रामगोपाल यादव यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.