नवी दिल्ली- उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांची अखेर १७ दिवसांनी सुटका झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या मदतकार्याला अखेर यश आलं आहे. सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ( All 41 workers trapped inside the Silkyara tunnel in Uttarakhand since November 12 have been successfully rescued)
12 नोव्हेंबरला बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते. त्यासाठी विदेश तज्ज्ञांची मदत देखील घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मदतकार्याकडे लक्ष ठेवून होते. तसेच विविध एजेन्सी मदतकार्यामध्ये गुंतल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नाला आज यश आलं आहे. सर्व मजूर बाहेर आल्याने सर्व भारतीयांमध्ये आनंदाची भावना आहे.
बोगद्याचे काम सुरु असताना काही भाग कोसळल्याने ४१ मजूर आतमध्ये अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु होते, पण या कामात विविध अडथळे येत होते. मजूरांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व बाजुंनी खोदकाम सुरु होते. ऑगर मशिन आपल्या कामात अपयशी ठरली होती. त्यानंतर रॅट मायनर्सने महत्त्वाची भूमिका बजावली. रॅट मायनर्स टीममुळे मजुरांपर्यंत लवकर पोहोचता आल्याचं सांगितलं जातं.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाईपलाईन द्वारे अन्न आणि पाण्याचा पुरवठा केला जात होता. मजुरांनी १७ दिवस बोगद्यात राहण्याचं आव्हान पेललं आहे. सध्या मजुरांना रुग्णवाहिकच्या सहाय्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. कामगारांचे कुटुंबीय आपल्या व्यक्तीची सुटका झाल्याने समाधान व्यक्त करत आहेत. आवश्यक उपचारानंतर मजूरांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.