Odisha Train Accident: बचावकार्याला वेग; हवाई मंत्रालयाच्या सर्व विमान कंपन्यांना महत्वाच्या सूचना

ओडिशात झालेल्या भीषण ट्रेन अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत.
Odisha Train Accident: बचावकार्याला वेग; हवाई मंत्रालयाच्या सर्व विमान कंपन्यांना महत्वाच्या सूचना
Updated on

Odisha Train Accident: ओडिशात झालेल्या भीषण ट्रेन अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. देशात झालेल्या भीषण ट्रेन अपघातांपैकी हा एक चौथा सर्वात मोठा अपघात आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं सर्व विमान कंपन्यांना विशेष आवाहन केलं आहे. (All airlines are advised to extend full support to deceased back to states where they used to live Ministry of Civil Aviation)

या अपघातात २८८ मृतदेह अद्यापपर्यंत हाती आले आहेत. पण आता हे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्याची जबाबदारी देखील सरकारच्याच खांद्यावर असणार आहे. त्यामुळेच नागरी हवाई मंत्रालयानं अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांचे शव त्यांच्या मूळ घरी पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत करावी, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Odisha Train Accident: बचावकार्याला वेग; हवाई मंत्रालयाच्या सर्व विमान कंपन्यांना महत्वाच्या सूचना
Supreme Court: बलात्कार पीडितेची कुंडली तपासण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

दरम्यान, अपघातानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पंतप्रधान मदत निधीतून मृतांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. (Marathi Tajya Batmya)

Odisha Train Accident: बचावकार्याला वेग; हवाई मंत्रालयाच्या सर्व विमान कंपन्यांना महत्वाच्या सूचना
Odisha Train Accident: पाकिस्तान ते रशिया, रेल्वे अपघातावर जगभरातील नेत्यांनी व्यक्त केल्या भावना; काय म्हणालेत वाचा

तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली, तसेच घटनेचा आढावा घेतला. तसेच त्यांनीही अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. तसेच काँग्रेसनंही सर्व राजकीय पक्षांना एकत्र येत यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी सर्व खासदारांना आपला एक महिन्याचा पगार मदत म्हणून देण्याचं आवाहन केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()