‘एआयकेएचएफ’मुळे समीकरणे बदलणार; जम्मूमध्ये भाजपच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता

गेल्या २६ वर्षांपासून काश्‍मिरी पंडितांचे नेतृत्व करणाऱ्या अखिल भारतीय काश्मिरी हिंदू फोरमच्या (एआयकेएचएफ) काँग्रेसमधील विलीनीकरणाने जम्मूतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
All India Kashmiri Hindu Forum merges with Congress may alter political equations in Jammu
All India Kashmiri Hindu Forum merges with Congress may alter political equations in JammuSakal
Updated on

नवी दिल्ली : गेल्या २६ वर्षांपासून काश्‍मिरी पंडितांचे नेतृत्व करणाऱ्या अखिल भारतीय काश्मिरी हिंदू फोरमच्या (एआयकेएचएफ) काँग्रेसमधील विलीनीकरणाने जम्मूतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपने येथे वर्चस्व स्थापित केले आहे. या वर्चस्वाला पहिल्यांदा धक्का बसण्याची शक्यता आहे.

१९९८ मध्ये ‘एआयकेएचएफ’ची स्थापन झाली. या संस्थेचे अध्यक्ष रत्तनलाल भान आहेत. ते गेल्या २६ वर्षांपासून काश्‍मिरी पंडितांच्या प्रश्नांसाठी लढा देत आहेत. या काळात या संघटनेचे भाजपला समर्थन राहिले आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता असताना सुद्धा काश्‍मिरी पंडितांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली तर नाहीच उलट अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप रत्तनलाल भान यांनी केला आहे.

हे विलीनीकरण मतदानाच्या काही दिवस आधी होत असल्याने या विलीनीकरणाला राजकीय रंग आला आहे. दुसऱ्या टप्प्यात जम्मू या लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. जम्मूमध्ये हिंदूंचे प्राबल्य असल्याने या मतदारसंघातून नेहमीच हिंदू प्रतिनिधी लोकसभेत निवडून येत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे जुगलकिशोर शर्मा यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले आहे.

२००९ मध्ये काँग्रेसने या मतदारसंघातून विजय संपादन केला होता. आता पुन्हा काँग्रेसने या मतदारसंघातून रमन भल्ला यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारच्या काळात स्थलांतरितांसाठी कोणतेही ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याचे सांगून रतनलाल भान यांनी पंतप्रधान मोदी यांच्या धोरणावर टीका केली आहे.

काश्‍मिरी पंडितांसाठी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सर्वात चांगले कार्य झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मूळ काश्मीरमध्ये असल्याने काँग्रेस पक्षाला नेहमीच काश्‍मिरी पंडितांबद्दल सहानुभूती राहिली आहे, असेही भान यांनी सांगितले.

मोदी सरकारने पंडितांची दिशाभूल केली व पंडितांच्या स्थितीचा फायदा घेऊन त्यांनी संपूर्ण देशात सत्ता काबीज केली आहे. भाजपने केवळ काश्मिरी पंडितांचे शोषण केल्याचा आरोप केला आहे. काश्‍मिरी पंडितांच्या या मोठ्या संघटनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये झाल्याने पुढील आठवड्यात होणाऱ्या जम्मूच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.