केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांना मोठा धक्का; जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार

पत्रकार कप्पन यांच्यावर देशद्रोहासह अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत.
Journalist Siddique Kappan
Journalist Siddique Kappanesakal
Updated on
Summary

पत्रकार कप्पन यांच्यावर देशद्रोहासह अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत.

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील तुरुंगात (Uttar Pradesh Jail) असलेले केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन (Journalist Siddique Kappan) यांना कोणताही दिलासा मिळालेला नाहीय. अलाहाबाद उच्च न्यायालयानं पत्रकार सिद्दीकी कपन यांना जामीन नाकारलाय.

सिद्दीकी कप्पन यांना ऑक्टोबर 2020 मध्ये हाथरसला जात असताना अटक करण्यात आली होती. कप्पन यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयानं (Allahabad High Court) गेल्या सुनावणीत निर्णय राखून ठेवला होता.

Journalist Siddique Kappan
अझरबैजान-आर्मेनियामधला संघर्ष पुन्हा पेटला; हल्ल्यात तीन सैनिक ठार, अनेक जखमी

दरम्यान, पत्रकार सिद्दीकी यांना उत्तर प्रदेशातील मथुरा पोलिसांनी (Mathura Police) 5 ऑक्टोबर 2020 रोजी अटक केली होती. पत्रकार कप्पन हे सामूहिक बलात्कारानंतर मरण पावलेल्या दलित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरस येथील एका गावात जात होते. त्यावेळी शांतता भंग केल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांच्यावर देशद्रोहासह अनेक आरोप ठेवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.