नवी दिल्ली- अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमधील एका खोलीत बॉम्ब फूटल्याची घटना घडली आहे. यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. माहितीनुसार, हा विद्यार्थी खोली क्रमांक ६८ मध्ये अवैधरीत्या बॉम्ब बनवत होता. त्यावेळी बॉम्बचा स्फोट झाला. यात विद्यार्थ्याच्या तळहाताला मोठी इजा झाली आहे. (Allahabad University MA Student Injured In Explosion While Making Bomb Inside Hostel Room)
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी पीसीबी हॉस्टेलच्या एका खोलीचा अवैध ताबा घेऊन बॉम्ब बनवत होता. यावेळी स्फोट झाल्याने त्याच्या हाताला इजा झाली आहे. तसेच त्याच्या छातीमध्ये छर्रे घुसले आहेत. सदर घटना घडताच कर्नलगंज पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. विद्यार्थ्याला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली. इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी एमएचा अभ्यास करणारा आहे. त्याचं नाव प्रभात यादव आहे. बॉम्ब बनवत असताना अचानक स्फोट झाल्याने तो जखमी झाला. इतर एका विद्यार्थ्याला किरकोळ जखम झाली आहे.
पोलिस प्रभात यादव विरोधात आवश्यक त्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना अवैध काम करताना पकडण्यात आले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.