West Bengal: केंद्राविरोधात TMC विधानसभेत आणणार ठराव

बंगाल विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 14 ते 22 सप्टेंबरला होणार
bangal
bangalesakal
Updated on

पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल कॉंग्रेसने, केंद्रीय तपास यंत्रनेचा गैर वापर होत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. याच्या विरोधात बंगाल विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रस्तावावर विचार करणार आहे. TMC चा आरोप आहे की, केंद्र सरकार सत्ता परिवर्तनासाठी तपास यंत्रनेचा गैरवापर करत आहे.

बंगाल विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 14 ते 22 सप्टेंबरला होणार आसल्याचे सांगितले जाते. या अधिवेशनात केंद्राच्या विरोधात प्रस्ताव आणला जावू शकतो. राज्याचे संसदीय कार्यमंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय म्हणाले, या सत्रात काही प्रस्तावांवर चर्चा झाली आहे. पुढच्या काही दिवसात या प्रस्तावावर निर्णय घेतला जावू शकतो, त्यानंतर पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत हा प्रस्ताव सभागृहाच्या सल्लागार समितीसमोर ठेवला जाईल.

TMC च्या काही सुत्रांनी सांगितल आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर 'राजकीय हत्यार' म्हणून वापर करणाऱ्यांनविरोधात ठराव आणण्याची योजना आखली जात आहे. TMC च्या एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले की, भाजप केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर सर्व विरोधी शासित राज्यांमध्ये सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत आहे. भाजप नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे या यंत्रणेचे लक्ष नाही.

bangal
Central Vista Avenue : पहिला टप्पा गुरुवारपासून खुला, अशी असणार रचना

तृणमूल काँग्रेसला झटका देत ईडी आणि सीबीआयने, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पार्थ चॅटर्जी ,आणि पक्षाचे नेते अनुब्रत मंडल यांना अटक केली आहे. माजी शिक्षण मंत्री चटर्जी यांना जुलैमध्ये ईडीने शालेय नोकरी घोटाळ्यात अटक केली होती, तर टीएमसीचे बीरभूम जिल्हाध्यक्ष मंडल यांना गेल्या महिन्यात सीबीआयने जनावरे तस्करी प्रकरणात अटक केली होती.

भाजप प्रस्तावाल विरोध करणार

भाजप नेत्यानी सांगितल की आधिवेशनात आणल्या जाणाऱ्या प्रस्तावाला विरोध करणार आहे, भाजपचे मुख्य प्रवक्ते मनोज तिग्ना म्हणाले, जर कोणी चुकीची कामे करत नसेल तर भितीवाटायची काही गरज नाही, कायद्यानुसार तपास यंत्रना काम करत आहेत. आम्ही असा कोणताही प्रस्ताव लागू होवून देणार नाही.

भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयने केली टीएमसी आमदाराची चौकशी

कोलकत्त येथे भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयने तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची चौकशी केली. बंगालमध्ये मतदानानंतरच्या हिंसाचारात कोलकाता येथे भाजप कार्यकर्ता अभिजित सरकारचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे आमदार परेश पाल हे मंगळवारी सीबीआयसमोर हजर झाले. पाल हे बेलीघाटाचे आमदार आहेत. याप्रकरणी सीबीआयने मे महिन्यात त्यांची चौकशीही केली होती. कोलकात्या जवळील सॉल्ट लेक येथील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एजन्सीच्या कार्यालयात पाल यांची चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.