'कृष्णा लवाद'चा निकाल जाहीर होताच आलमट्टी धरणाची उंची वाढवणार'

'कृष्णा लवाद'चा निकाल जाहीर होताच आलमट्टी धरणाची उंची वाढवणार'
Updated on
Summary

धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत २५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

बंगळूर : कृष्णा लवादच्या अंतिम निकालाची गॅझेट अधिसूचना जाहीर होताच सक्षम प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा विचार करण्यात येईल. धरणाची उंची ५१९.६० मीटरवरून ५२४.२५६ मीटर वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ यांनी मंगळवारी (२१) विधानसभेत दिली. बसवनबागेवाडीचे आमदार शिवानंद पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते.

'कृष्णा लवाद'चा निकाल जाहीर होताच आलमट्टी धरणाची उंची वाढवणार'
'मी भला, माझे काम भले', अजित पवारांनी सोमय्यांवर बोलणे टाळले

धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत २५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. कृष्णा लवादच्या निर्वाळ्यानुसार गॅझेट जाहीर करण्याची मागणी केली. आता केंद्राकडून गॅझेट अधिसूचना जारी होणे तेवढेच बाकी आहे. कृष्णा अपर (मेल्दंडे) योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्याची केंद्रीय जल आयोगाला निर्देश देण्याची मागणीही केंद्रीय जलसंपदामंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचे कारजोळ यांनी स्पष्ट केले. २०१३ ते २०१९ च्या कालावधीत काँग्रेस सरकार व त्यानंतरच्या काँग्रेस-धजद युती सरकारने या योजनेसंदर्भात काहीच हालचाली केल्या नाहीत. आता आम्ही महाराष्ट्र सरकारशी वाटाघाटी करून कृष्णा पाणीप्रश्‍नी संयुक्तपणे याचिका दाखल केली आहे.

'कृष्णा लवाद'चा निकाल जाहीर होताच आलमट्टी धरणाची उंची वाढवणार'
'सत्तेसाठी नेत्यांना सांभाळण्याचं जयंतरावांचं धोरण'

सुप्रिम कोर्टाने १६ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या निर्वाळ्यानुसार कृष्णा लवाद-२ च्या निकालासंबंधी कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अर्जांवर निकाल बाकी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि लवादच्या निकालानुसार गॅझेट जाहीर करण्यास केंद्राला निर्देश द्यावेत, अशा मागणीचा अर्ज राज्याने सर्वोच्च न्यायालयात १८- २- २०१९ मध्येच सादर केला आहे. सदरील दाव्यात केंद्र सरकारला स्पष्टीकरण करण्यास द्यावे, अशा मागणीचा अर्जही २३- ०१- २०२० मध्ये सुप्रिम कोर्टाला सादर केला असल्याचे कारजोळ यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.