Humans Population : चक्क 9 लाख वर्षांपूर्वी नामशेष होणार होता मानव! 1% उरली होती लोकसंख्या, हे होते कारण

सुमारे 9 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर 98 हजार लोक होते
Humans Population
Humans Populationesakal
Updated on

Humans Population : सुमारे 9 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर 98 हजार लोक होते. पण हवामानातील बदलामुळे या लोकांचा मृत्यू होऊ लागला. आणि केवळ 1,280 लोक शिल्लक राहिले, यातून आजची मानवजात विकसित झाली.

9 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर फक्त 1,280 लोक शिल्लक होते. ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही पण हे अगदी खरं आहे. जनुकीय संशोधनात ही बाब समोर आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चिनी संशोधकांचे म्हणणे आहे की, सुमारे 9 लाख 30 हजार वर्षांपूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे मानव अस्तित्वात राहू शकला नाही.

Humans Population
Eye Care Tips : तुम्हीही जोर देऊन डोळे चोळताय का? दृष्टीवर होतील दुष्परिणाम

वास्तविक पाहता, सुमारे 9 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर 98 हजार लोक होते. यानंतर हवामानातील बदलामुळे या लोकांचा मृत्यू होऊ लागला. या परिस्थितीला 'बॉटलनेक' असे म्हणतात. हा 'बॉटलनेक' कालावधी 1 लाख 17 हजार वर्षे टिकला. या काळात पृथ्वीवर फक्त 1, 280 लोक उरले होते.सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की आपल्या 98.7 टक्के पूर्वजांचा बॉटलनेक कालावधीच्या सुरुवातीला मृत्यू झाला होता. म्हणजे त्यांची संख्या 1,280 बाकी होती. त्यामुळे मानवाचे अस्तित्व धोक्यात आले. तथापि, हा कालावधी संपल्यानंतर, लोकसंख्या वाढली आणि आज पृथ्वीवर 8 अब्ज (800 कोटी) पेक्षा जास्त लोक राहतात.

Humans Population
Eye Care Tips : गेलेली दृष्टीसुद्धा परत येईल, फक्त या व्हिटॅमिनची साथ कधी सोडू नका

संशोधनानुसार, 'बॉटलनेक'मुळे मानव दोन वंशांमध्ये विभागला गेला - निएंडरथल आणि आधुनिक मानव. निएंडरथल्स 40 हजार वर्षांपूर्वी नामशेष झाले. निएंडरथल हा मानवाच्या होमो वंशाचा नामशेष झालेला सदस्य आहे.जर्मनीतील निएंडर व्हॅलीमध्ये आदिम मानवाची काही हाडे सापडली होती, त्या आधारावर त्यांना निएंडरथल मनुष्य असे नाव देण्यात आले. त्यांची उंची इतर मानवजातींपेक्षा लहान होती. आतापर्यंतच्या अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार, उंची 4.5 ते 5.5 फूट दरम्यान होती.

Humans Population
Eye Care Tips : तुम्हीही जोर देऊन डोळे चोळताय का? दृष्टीवर होतील दुष्परिणाम

आता प्रश्न पडतो की हवामान बदलामुळे मानवाचे अस्तित्व धोक्यात कसे आले? चला जाणून घेऊया...

संशोधकांच्या मते, 'बॉटलनेक' काळात हवामानात खूप वेगाने बदल झाले होते. या बदलाला मिड-प्लेस्टोसीन संक्रमण असे म्हणतात. यामध्ये हिमनदीचा काळ वाढला. दुसऱ्या शब्दांत, हा काळ हिमयुगाचा होता. म्हणजे पृथ्वी असह्य थंड पडली होती आणि हवेतील आर्द्रता कमी झाली होती. बहुतांश भाग कोरडा होता. ही परिस्थिती कोणत्याही माणसाच्या जगण्यासाठी खूप कठीण होती.

Humans Population
Car Care Tips : आता कारमध्ये वाटेल गार-गार; AC मध्ये करा एवढाच बदल, मायलेजसुद्धा वाढेल

आता जाणून घ्या जनुकीय अभ्यास कसा केला गेला...

डीएनएमध्ये होणाऱ्या जनुकीय फरकांची तुलना करून, शास्त्रज्ञ प्राचीन लोकसंख्येची ओळख करू शकले (जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या, फिरत असलेले आणि एकमेकांशी जोडलेले असलेले प्राचीन लोकसंख्येतील लोक) शोधू शकले. मानववंश शास्त्रज्ञ इतिहासात वेगवेगळ्या वेळी त्या लोकसंख्येच्या संख्येचा अंदाज लावू शकतात.

Humans Population
Beauty Tips: नखांना लागलेली मेहंदी झटपट काढण्याचे घरगुती उपाय, जाणून घ्या

चीनी संशोधकांनी मानवी उत्क्रांती समजून घेण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. त्याचे नाव दिले FitCoal म्हणजेच फास्ट इन्फिनिटिसिमल टाइम कोलेसंट. याद्वारे शास्त्रज्ञ काळाच्या आधारे मानवी इतिहासाची (मानवी उत्क्रांती) विभागणी करू शकतात. सहज समजण्यासाठी, FitCoal द्वारे, शेकडो किंवा हजारो वर्षांमध्ये झालेले बदल (उत्क्रांती) महिन्यांत विभागले गेले.

Humans Population
Eye Care Tips : डोळ्यांना दिसायचंच बंद झालंय? ही फळ परत करतील तुमची नजर, आजच खायला सुरूवात करा

पृथ्वीवरील वेगवेगळ्या कालखंडातील मानवी लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी 3,000 लोकांच्या जीनोममधून अनुवांशिक डेटा गोळा केला. यावरून असे दिसून आले की 9.30 ते 8.13 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर सुमारे 1 लाख मानव राहत होते. हळूहळू हे 1,280 पर्यंत कमी झाले. या लोकांमधून आजची मानवजाती विकसित झाली आहे.

Humans Population
Hair Care Tips हेअर डायऐवजी वापरा हळदीचे पॅक, केसांना मिळेल नॅचरल काळा रंग

संशोधक डॉ. ली म्हणतात, फिटकोल हे एक असे साधन किंवा पद्धत आहे, ज्याद्वारे आपण सजीवांची निर्मिती आणि बदल एका कालखंडात विभागून पाहू शकतो. हे सजीव मानव तसेच वनस्पती आणि झाडे असू शकतात.येशूच्या जन्माच्या वेळी जगाची लोकसंख्या सुमारे 20 कोटी होती. 100 कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1800 वर्षे लागली. यानंतर जगाला 100 कोटींवरून 200 कोटींपर्यंत पोहोचायला केवळ 130 वर्षे लागली.

Humans Population
Tech Tips : GPay वापरताय का? हे सेटींग आत्ताच बदला नाहीतर अकाऊंट रिकामं झालंच म्हणून समजा!

येत्या 18 वर्षात पृथ्वीवर 850 कोटी मानव असतील. ताज्या ट्रेंडवर नजर टाकली तर अवघ्या 12 वर्षात पृथ्वीवरील मानवांची संख्या 700 कोटींवरून 800 कोटी झाली आहे. UN च्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 850 कोटीपर्यंत वाढू शकते. तथापि, यूएनने असेही म्हटले आहे की 1950 नंतर प्रथमच 2020 मध्ये लोकसंख्या वाढीच्या दरात एक टक्क्यांनी घट झाली आहे.

Humans Population
Health Tips : आरोग्यासाठी दूध चांगलं पण ते कशासोबतही खाऊ नका, दूध आवडतं तर हे नियमही जाणून घ्या

28 वर्षांनंतर, जगाच्या लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या 8 देशांमध्ये असेल

UN लोकसंख्येच्या अहवालात असे म्हटले आहे की 2050 पर्यंत निम्म्याहून अधिक लोकसंख्या फक्त आठ देशांमध्ये असेल. यामध्ये भारत, पाकिस्तान, फिलिपाइन्स, इजिप्त, काँगो, नायजेरिया, टांझानिया आणि इथिओपिया यांचा समावेश आहे. 2022 ते 2050 दरम्यान ज्यांची लोकसंख्या कमी होईल अशा 61 देशांचा अंदाजही यूएनने वर्तवला आहे. यातील बहुतांश देश युरोपातील असतील. सध्या, 46 देशांची लोकसंख्या सर्वात वेगाने वाढत आहे, त्यापैकी 32 देश उप-सहारा आफ्रिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.