कधीही अन् कुठेही होऊ शकतो करोना, केंद्राचा इशारा

कधीही अन् कुठेही होऊ शकतो करोना, केंद्राचा इशारा
Updated on

CoronaVirus, Covid 19, New Variants : मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. आता दुसरी लाट हळूहळू कमी होत असतानाच तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. आल्फा, बिटा, गामा, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका अद्याप कमी झालेला नाही. हे व्हेरियंट कधीही आणि कुठेही बाधित करु शकतात, असा इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (National Centre for Disease Control – NCDC) संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी मंगळवारी देशातील नागरिकांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत डेल्टा व्हेरियंटनं देशाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. मागील काही काळात देशात आढलेले कोरोना रुग्ण डेल्टा व्हेरेयंटचे आहेत, असं समोर आल्याचेही सिंह म्हणाले.

आल्फा, बिटा, गामा, डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना व्हेरियंटसोबत आणखी दोन व्हेरियंटवर संशोधन सुरु आहे. यासोबतच Kappa आणि B1617.3 या व्हेरियंट्सवरही संशोधन सुरू असल्याचं सिह यांनी सांगितलं. या दोन व्हेरियंटसबाबत सिंह यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. याशिवाय इतर म्यूटेंट कोरोना व्हेरियंटचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितलं. नवीन व्हेरियंट कुणालाही नुकसान पोहचवू शकतात, असं सिंह यांचं मत आहे.

कधीही अन् कुठेही होऊ शकतो करोना, केंद्राचा इशारा
…म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर PM मोदींचा फोटो; केंद्राने दिलं उत्तर

डॉ एस.के सिंह म्हणाले की,' जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनेनुसार नव्या व्हेरियंटचा शोध सुरु असल्याचे सांगितलं. ते म्हणाले की, प्रत्येक राज्यात जीनोम सिक्वेन्सनुसार तपासणी केली जात आहे. नव्या व्हेरियंटा शोध घेण्यासाठी चाचणी घेऊन पडताळणी केली जात आहे.' यावेळी सिंह यांनी देशातील डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णाची माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंटचे 86 रुग्ण आढळल्याची माहिती सिंह यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()