Amazon Job Scam: नोकरीचे आमीष देऊन घातला लाखोंचा गंडा! या चूका तुम्हीही करत असाल तर सावध व्हा

१०० पेक्षा अधिक लोकांची या प्रकरणात आतापर्यंत फसवणूक झाली आहे
Amazon Job Scam
Amazon Job Scamesakal
Updated on

Cyber Crime: सायबर क्राइमच्या प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे दिसून येते. अनेक प्रकरणांवर ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या जाताय. या प्रकरणांमध्ये जॉब स्कॅम सध्या मोठ्या प्रमाणात वाढीवर असल्याचे दिसून येते. ॲमेझॉन कंपनीच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा घातला गेला. तेव्हा जॉब अपॉर्च्युनिटीच्या नावाखाली तुमच्यासोबतही असा प्रकार घडू शकतो. १०० पेक्षा अधिक लोकांची या प्रकरणात आतापर्यंत फसवणूक झाली आहे. तेव्हा वेळीच सावध राहा.

काय आहे जॉब स्कॅम प्रकरण?

स्कॅमरकडून तब्बल सव्वा तीन लाखांच्या फसवणुकीनंतर २० वर्षीय रीचा नावाच्या तरूणीने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. रिपोर्टनुसार, या तरूणीला एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून मॅसेज आला होता. हॅकरने तिला ॲमेझॉनवर नोकरी मिळवून देण्याचे आमीष दिले. हॅकरने नोकरी डॉट कॉम आणि शाइन डॉट कॉम सारख्या सोशल साइट्सवरून या तरुणीची माहिती मिळवली होती.

हॅकरने तयार केली बनावटी वेबसाइट

हॅकर्सने काही सॉफ्टवेअरच्या मदतीने बनावटी ॲमेझॉन वेबसाइट तयार केली. अनेक लोकांनी ॲमेझॉनची नोकरी मिळवण्यासाठी या वेबसाइटवर अप्लाय केलं. लिंकवर क्लिक करणाऱ्या लोकांसाठी वेबसाइटवर काही टास्कही देण्यात आले होते. हे बनावटी टास्कसुद्धा अप्लाय करणाऱ्यांना खरे वाटले. रिपोर्टच्या मते, यानंतर स्कॅमरने लोकांना वर्च्युअल वॉलेट बनवण्यास सांगितले.

Amazon Job Scam
YouTube Premium चा मोफत आनंद घ्या अन् ते पण Ads free, जाणून घ्या कसं?

असे राहा सावध

  • तुम्हाला आधी हे लक्षात ठेवावे लागेल की ॲमेझॉन सारखी ब्रँड कंपनी कधी तुम्हाला अनप्रोफेशनल पद्धतीने पर्सनल मॅसेज करणार नाही.

  • तसेच तुम्ही एखाद्या बनावटी कंपनीच्या कचाट्यात सापडलेच तर हे लक्षात ठेवा की कंपनीची हायरींग फार लांबलचक असते.

  • तेव्हा कुठलाही इंटरव्ह्यू देण्याआधी त्या कंपनीबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.