'अमर जवान ज्योती' होणार राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिन

amar jawan jyoti
amar jawan jyotiesakal
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या (Indian army) शूर सुपुत्रांच्या स्मरणार्थ गेल्या 50 वर्षांपासून इंडिया गेटवर (India gate) धगधगत असलेली 'अमर जवान ज्योती' राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी 2019 मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात अग्नीला नवीन ठिकाणी नेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी (republic day) लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधानांनी युद्धस्मारकाला पुष्पहार अर्पण केला.

26 हजारांहून अधिक शहीद भारतीय सैनिकांच्या नावांची नोंद

शुक्रवारी दुपारी होणाऱ्या समारंभात जळत्या अग्नीचे काही भाग इंडिया गेटपासून राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या धगधगत्या ज्योतीपर्यंत नेले जातील. त्यानंतर इंडिया गेटवर ज्योत विझवली जाईल. इंडिया गेटजवळील राष्ट्रीय युद्ध स्मारक 40 एकरपेक्षा जास्त जागेत बांधण्यात आले असून स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या 26 हजारांहून अधिक भारतीय सैनिकांच्या नावांची नोंद आहे. येथे राष्ट्रीय युद्ध संग्रहालय देखील आहे.

भारत-पाक युद्धात शहीद भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना

माहितीनुसार, 1971 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली. या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. 26 जानेवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे सर्व सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मारक आहे, जिथे रायफल आणि सैनिकांचे हेल्मेट संगमरवरी लावलेले आहे.

amar jawan jyoti
घानामध्ये भीषण स्फोट; १७ जणांचा मृत्यू, शेकडो इमारतींचे नुकसान

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अधिकृत सूत्रांनी यापूर्वी सांगितले होते की, वेगवेगळ्या युद्धांमध्ये देशासाठी प्राण गमावलेल्या लष्करी जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोणतेही युद्ध स्मारक नाही, त्यामुळे इंडिया गेटवर ज्योत पेटली. आता येथे समर्पित संग्रहालय असल्याने ही ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन होणार आहे.

amar jawan jyoti
अनिल देशमुख गौप्यस्फोट | परमबीर माझ्यासमोर थरथर कापत होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()