Amarnath Yatra 2023 : भाविकांचं रिअल टाइम ट्रॅकिंग ते ५ लाखांपर्यंत विमा; सरकारकडून अमरनाथ यात्रेची चोख तयारी!

Amarnath Yatra File Photo
Amarnath Yatra File Photoesakal
Updated on

अमरनाथ यात्रे बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी महत्वाची माहिती दिली आहे. अमरनाथ यात्रेकरूंचा प्रवास सुरळीत व्हावा हे नरेंद्र मोदी सरकारचे प्राधान्य आहे आणि जम्मू-काश्मीरमधील संपूर्ण यात्रेच्या मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठक झालेल्या या बैठकीत त्यांनी केंद्र सरकार, लष्कर आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,880 मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथच्या पवित्र गुहेची 62 दिवसांची वार्षिक यात्रा 1 जुलैपासून सुरू होईल आणि 31 ऑगस्टपर्यंत चालेल.

बैठकीदरम्यान, गृहमंत्र्यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेकरूंना आरामात दर्शन मिळावे आणि त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, ही नरेंद्र मोदी सरकारची प्राथमिकता आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, त्यांनी अधिकाऱ्यांना अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गावर विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम या दोन मार्गांनी यात्रेकरू प्रवास करतात. या बैठकीत सर्व यात्रेकरूंना आरएफआयडी कार्ड दिले जातील जेणेकरून त्यांचे रिअल टाइम लोकेशन ट्रेस केले जाईल आणि सर्वांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या प्रत्येक जनावरासाठी 50,000 रुपयांचे विमा संरक्षण असेल.

Amarnath Yatra File Photo
Sharad Pawar Death Threat : जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, चिंता...

श्रीनगर-जम्मू येथून रात्रीची विमानसेवा

गृहमंत्री अमित शाह यांनी यात्रेकरूंच्या सोयीसाठी विमानतळ आणि रेल्वे स्थानक ते तीर्थक्षेत्र आधार शिबीर या मार्गावर व्यवस्था चोख ठेवण्यावर भर दिला आणि श्रीनगर आणि जम्मू येथून रात्रीची विमानसेवा देण्याचे निर्देश दिले. ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा आणि त्यांचे रिफिलिंग सुनिश्चित करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले आणि डॉक्टरांच्या अतिरिक्त पथकांची उपलब्धता करण्यास सांगितले.

कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात खाटा आणि रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर तैनात करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. यात्रेकरूंसाठी प्रवास, मुक्काम, वीज, पाणी, दळणवळण, आरोग्य यासह आवश्यक त्या सर्व सुविधांची योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचना शाह यांनी दिल्या. तसेच यात्रेच्या मार्गांवर दरड कोसळल्यास मार्ग त्वरित खुले करण्यासाठी मशीन्स तैनात करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Amarnath Yatra File Photo
Sharad Pawar Death Threat : "मी भाजप कार्यकर्ता, सेक्युलॅरीजमचा हेट करतो!"; पवारांना धमकी देणारा पिंपळकर कोण?

यासोबतच यात्रा मार्गांवर तंबूची व्यवस्था, वाय-फाय हॉटस्पॉट आणि योग्य प्रकाश व्यवस्था करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, ऑनलाइन-लाइव्ह 'बाबा बर्फानी दर्शन', पवित्र अमरनाथ गुहेतील सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण आणि बेस कॅम्प्सवर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यात म्हटले आहे.

यावेळी 5 लाख भाविक अमरनाथला पोहोचणार

गेल्या वर्षी 3.45 लाख भाविकांनी या यात्रेच्या मध्यामातून दर्शन घेतले होते आणि यावर्षी ही संख्या पाच लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. सूत्रांनी सांगितले की, कोणत्याही संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) यात्रेकरूंच्या छावण्यांसाठी योग्य ठिकाणे शोधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पवित्र गुहेजवळ आलेल्या पुरामुळे 16 भाविकांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.