कोविडच्या संकटामुळं अमरनाथ यात्रा यंदाही रद्द!

यात्रा रद्द झाली असली तरी भाविकांना ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.
Amarnath Shrine
Amarnath Shrinefile photo
Updated on

नवी दिल्ली : अमरनाथ यात्रा यंदाही सलग दुसऱ्यावर्षी रद्द करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मिर सरकारने कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. मात्र, या पवित्र गुफेमध्ये सर्व धार्मिक विधी पार पडतील, असं अमरनाथ तीर्थक्षेत्र बोर्डानं स्पष्ट केलं आहे. (Amarnath Yatra cancelled for second consecutive year due to covid)

अमरनाथ तीर्थक्षेत्र बोर्डानं आपल्या निवेदनात म्हटलं की, "जम्मू आणि काश्मीर सरकारकडून कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा रद्द झाली असली तरी भाविकांना ऑनलाइन दर्शन उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. पवित्र गुफेच्या ठिकाणी गेल्यावर्षीप्रमाणं यंदाही सर्व प्रकारची पारंपारिक धार्मिक विधी पार पडणार आहेत."

Amarnath Shrine
मराठा आरक्षण: संभाजीराजेंनी दिला एक महिन्याचा अल्टीमेटम

जम्मू-काश्मीरमध्ये हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ३,८८० मीटर उंचीवर हे हिंदू धर्मियांसाठीचं पवित्रस्थळ (गुफा) आहे. यामध्ये अमरनाथ अर्थात भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी यात्रा भरवली जाते. भारतातील अनेक तीर्थ यात्रांपैकी या यात्रेला मोठं धार्मिक महत्व आहे. ही यात्रा ५६ दिवस चालते. या यात्रेचा कालावधी निश्चित असून दरवर्षी २८ जून रोजी या यात्रेचा प्रारंभ होतो तर २२ ऑगस्ट रोजी या यात्रेची सांगता होते. या यात्रेसाठी पेहलगाम आणि बलताल असे दोन अधिकृत मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

Amarnath Shrine
शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक फोडले

दरम्यान, सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती अद्याप संपलेली नाही. तसेच तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर ही वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.