नोबेल पुरस्कार विजेता अमर्त्य सेन हे अमेरिकेतून कोलकात्याला आले आहेत. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. नवीन व्यवस्थेत 'सुनावणी शिवाय' तुरुंगात टाकल्या जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भारत हे हिंदू राष्ट्र नाही, असे देखील अमर्त्य सेन यांनी स्पष्ट केले. अलीकडील लोकसभा निवडणुकीचे निकाल हे दर्शवतात की भारत ‘हिंदू राष्ट्र’ नाही, असे ते म्हणाले.
अमर्त्य सेन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बंगाली वृत्तवाहिनीशी होते. "भारत हिंदू राष्ट्र नाही, हे निवडणूक निकालांमधून स्पष्ट होते. आपण नेहमी प्रत्येक निवडणुकीनंतर बदलाची अपेक्षा करतो. आधी (भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात) जे काही घडले, जसे की लोकांना सुनावणी शिवाय तुरुंगात टाकणे आणि श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढवणे, ते अजूनही चालू आहे. हे थांबवायला हवे," असे सेन म्हणाले.
अमर्त्य सेन म्हणाले, राजकीय दृष्ट्या खुले विचार असणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि याचा संविधानदेखील धर्मनिरपेक्ष आहे. मला वाटत नाही की भारताला 'हिंदू राष्ट्र' बनवण्याची कल्पना योग्य आहे.
अमर्त्य सेन यांनी सांगितले की जेव्हा ते लहान होते, तेव्हा भारत ब्रिटिश शासनाच्या अधीन होता आणि लोकांना सुनावणी शिवाय तुरुंगात टाकले जात होते. माझ्या अनेक काका आणि चुलतभावांना तुरुंगात टाकण्यात आले होते. आम्हाला आशा होती की भारत यापासून मुक्त होईल. काँग्रेसदेखील यासाठी दोषी आहे की त्यांनी यात काही बदल केला नाही. परंतु, सध्याच्या सरकारच्या अंतर्गत हे अधिक प्रचलित झाले आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामानंतरही भाजपने फैजाबाद लोकसभा सीट गमावल्याबद्दल सेन यांनी सांगितले की, देशाच्या खरी ओळख दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतका पैसा खर्च करून राम मंदिराचे बांधकाम करण्यात आले. भारताला 'हिंदू राष्ट्र' म्हणून चित्रित करणे, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशात हे होणार नाही. हे भारताच्या खरी ओळख दडपण्याचा प्रयत्न आहे आणि हे बदलायला हवे.
सेन यांनी हेही सांगितले की, भारतात बेरोजगारी वाढत आहे, प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्यसेवेच्या क्षेत्रांची उपेक्षा केली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.