Amartya Sen : 'ममता बॅनर्जींमध्ये पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता : अमर्त्य सेन

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
amartya sen
amartya sen esakal
Updated on

Amartya Sen On Mamata Banerjee : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी देशाच्या पुढील पंतप्रधान पदासाठी मोठं विधान केले आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

amartya sen
Corona India Update : कोरोना रूग्णसंख्येने वाढली चिंता; लसींबाबत सीरमचा मोठा निर्णय

सेन म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.

amartya sen
Manish Sisodia : स्वागत आहे! सिसोदियांच्या कार्यालयावर पुन्हा सीबीआयची छापेमारी

2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाल्यास प्रादेशिक पक्ष प्रमुख असतील असेही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

अमर्त्य सेन म्हणाले की, "मला वाटते की, इतर कोणताही पक्ष भाजपची जागा घेऊ शकत नाही, असे मानणे नाकारणे चुकीचे ठरेल. कारण त्यांनी स्वतःला देशातील इतर पक्षांपेक्षा हिंदूंकडे अधिक कल असलेला पक्ष म्हणून स्वतःला स्थान दिले आहे." मात्र, भाजपने भारताचा दृष्टीकोन मोठ्या प्रमाणात संकुचित केल्याचं ते म्हणाले.

amartya sen
Video : 'ढिल दे दे रे भैय्या' म्हणत गुजरातमध्ये मुख्यमंत्री अन् अमित शाहांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद

काँग्रेसला संबोधले 'कमकुवत'

यावेळी सेन यांनी काँग्रेसला 'कमकुवत' असे संबोधले मात्र, काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असून, काँग्रेसच भारताला दृष्टी देऊ शकते असे ते म्हणाले. सेन यांचे हे विधान आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आले आहे. त्यामुळे या विधानाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.