PM Narendra Modi : अमेरिकेच्या उद्योगपतीकडून मोदींचे कौतुक; भारतासाठी नव्हे तर पाकिस्तानसाठीही फायदेशीर

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास दक्षिण आशियातील देशांबरोबर भारताचे सबंध एकरुप होण्याची शक्यता साजिद तरार या अमेरिकन व्यावसायिकाकडून वर्तविली जात आहे
PM Narendra Modi
PM Narendra Modisakal
Updated on

- मनाेज साळवे

PM Narendra Modi : अमेरिकेच्या एका व्यावसायिकाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरुन कौतुक होत आहे. सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी तयार आहेत. येत्या ९ तारखेला नेते तसेच इतर मान्यवराच्या उपस्थितीत हा शपथविधी होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांवर सर्व स्तरावरील लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास दक्षिण आशियातील देशांबरोबर भारताचे सबंध एकरुप होण्याची शक्यता साजिद तरार या अमेरिकन व्यावसायिकाकडून वर्तविली जात आहे. भारताच्या लोकसभा निवडणुक २०२४ प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान मोदी भाराताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर भारत पाकिस्तान सबंध सुरळीत होणार का? हे पाहणे खरे गरजेचे ठरणार आहे.

पाकिस्तान भारत व्यापार सुधारणार

येत्या काळात भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यास भारत, पाकिस्तान दोंन्ही देशामधील व्यापाराची आयात निर्यात करणे सोपे होणार आहे. तसेच दोन्ही देशांचे संबधही घट्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट तसेच इतर समस्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान भारतासोबत मवाळ भूमिका घेताना दिसत आहे.

पाकिस्तानकडून मोदींना शुभेच्छा नाही

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी झाल्याने पंतप्रधानांनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण पाकिस्तानकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या नाहीत.

PM Narendra Modi
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर एकामागोमाग घसरल्या ६ दुचाकी; वाचा नक्की काय घडलं

भारताच्या आमंत्रण पत्रिकेत पाकिस्तानचे नाव नाही

भारताकडून पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी शेजारील देशांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये श्रीलंका, भुतान, नेपाळ, बाग्लादेश यांचा समावेश आहे. मात्र आमंत्रणामध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.

उद्या होणाऱ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधासाठी बाग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच इतर मान्यवर कार्यक्रमावेळी हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.