चारमिनारमध्ये नमाज पठणाला परवानगी द्या; काँग्रेस नेत्याची मागणी

पूर्वी चार मिनारमध्ये नमाज अदा केली जात होती. मात्र, सुमारे दोन दशकांपूर्वी येथे नमाज अदा करण्यास बंदी घालण्यात आली.
Charminar
CharminarSakal
Updated on

हैदराबाद : देशातील ऐतिहासिक वास्तू, मंदिर-मशीद या वादाच्या भोवऱ्यात हैदराबादच्या चारमिनारबाबतही (Charminar) आता वाद निर्माण झाला आहे. तेलंगणा काँग्रेसचे नेते रशीद खान (Rashid Khan) यांनी चारमिनारमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी मिळावी यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून संरक्षित असून, पूर्वी चार मिनारमध्ये नमाज अदा केली जात होती. मात्र, सुमारे दोन दशकांपूर्वी लोकांना येथे नमाज अदा करण्यापासून रोखण्यात आल्याचे खान यांनी सांगितले. (Congress Leader Demand To Pray In Charminar )

Charminar
उद्धव ठाकरेंनी तारीख जाहीर केल्यास फुलांची उधळन करणार : जलील

दरम्यान, पूर्वी चार मिनारमध्ये नमाज (Namaj) अदा केली जात असत, परंतु, या ठिकाणी एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आल्याचे मौलाना अली कादरी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चार मिनारमध्ये नमाज अदा करण्याच्या परवानगीसाठी सांस्कृतिक मंत्रालय आणि एएसआयकडे मागणी करणार असून, सर्वांच्या सह्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचे रशीद खान यांनी सांगितले. तसेच नमाज अदा करण्यास परवानगी न मिळाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा रशीद खान यांनी दिला आहे.

Charminar
मंदिर, मशीद, सत्य आणि सलोखा

भाग्य लक्ष्मी मंदिराचे बांधकाम बेकायदेशीर

यावेळी राशिद खान यांनी एएसआयच्या अहवालाचा हवाला देत चार मिनारजवळील भाग्य लक्ष्मी मंदिर हे बेकायदेशीर बांधकाम असल्याचे म्हटले आहे. आम्ही गंगा जमुना तहजीबवर विश्वास ठेवतो. मंदिरात प्रार्थना होत असेल तर होऊ द्या, पण ज्या प्रकारे आमची मशीद बंद आहे, ती उघडून आम्हाला नमाज पठणास परवानगी दिली पाहिजे. जर एएसआय मशीद बंद करत असेल तर मंदिरदेखील बंद केले पाहिजे अशी मागणी खान यांनी केली आहे.

दुसरीकडे भाजपने काँग्रेस नेत्याच्या या मागणीला जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. चार मिनार आणि मंदिर या दोन मुद्द्यांना जोडणे हा जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()