रांची : ‘‘राहुल गांधी यांनी जाहीर सभेत राज्यघटनेची खोटीच प्रत दाखवली. असे करून त्यांनी राज्यघटनेची थट्टा उडवून तिचा अपमानच केला आहे,’’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. काँग्रेसला अल्पसंख्याकांसाठी आरक्षण द्यायचे आहे. ते भाजप कधीही करू देणार नाही, असा निर्धारही शहा यांनी यावेळी व्यक्त केला.