BJP Politics: अब की बार तामीळ पंतप्रधान! अमित शाहांची गुगली, भाजप कार्यकर्ते संभ्रमात

Amit Shah Calls For A Tamil PM In The Future
Amit Shah Calls For A Tamil PM In The Future
Updated on

Amit Shah News: आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

यात भाजपकडून राज्यात पुन्हा एकदा तीनशे पारचा नारा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी पंतप्रधान पदासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. Amit Shah Calls For A Tamil PM In The Future

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी चेन्नईमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दरवाजाच्या बैठकीत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

गरीब कुटुंबातील तमिळ व्यक्तीनं भारताचा पंतप्रधान व्हायला हवा असा दावा अमित शाह यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळं भाजप समर्थक संभ्रमात पडले आहेत.

Amit Shah Calls For A Tamil PM In The Future
Maharashtra Politics: शिंदे गटातील पाच मंत्र्यांवर टांगती तलवार; गच्छंतीसाठी भाजपचा दबाव?

आपण तामिळनाडूतील दोन संभाव्य पंतप्रधान कामराज आणि मूपनार यांची संधी गमावली आहे. त्यांना पंतप्रधान पदापर्यंत न पोहचू देण्यासाठी डीएमके जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

द्रमुक आणि त्याचे दिवंगत प्रमुख एम. करुणानिधी यांची खिल्ली उडवत त्यांनी तामिळनाडूतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. कामराज आणि जी.के. मूपनार यांच्याकडे पंतप्रधान होण्याची क्षमता होती, पण करुणानिधी यांनी त्यांची शक्यता हाणून पाडली, अस अमित शाह म्हणाले.

Amit Shah Calls For A Tamil PM In The Future
Sharad Pawar Threat Case: शरद पवार धमकी प्रकरणी एकाला अटक; आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. कर्नाटकात अपेक्षा होत्या, मात्र काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवत, तिथूनही भाजपला बाहेरचा रस्ता दाखवला. अशातच दक्षिणेकडून हद्दपार झाल्यानंतर भाजपनं पुन्हा दक्षिणेत पाय रोवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.