गंदेय : ‘‘झारखंडमधील पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर सोरेन यांच्या सरकारची उलटगणती सुरू झाली आहे,’’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केला. गंदेय येथील सभेमध्ये ते बोलत होते. झारखंडमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा दावाही शहा यांनी या वेळी केला.