Amit Shah: गरीब आदिवासींच्या धर्मांतरासाठी काँग्रेस सरकारी यंत्रणेचा वापर करते - अमित शाह

home minister amit shah
home minister amit shah esakal
Updated on

Chattisgarh Election : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचा दावा करीत येथील गरीब आदिवासींच्या धर्मांतरासाठी काँग्रेस सरकारी यंत्रणेचा वापर आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला.

home minister amit shah
Amit Shah : भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसे वसूल केले जातील; छत्तीसगडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री शहा यांची ग्वाही

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी शहा यांची पंडारिया येथे आज प्रचारसभा झाली. त्यात काँग्रेसवर टीका करताना म्हणाले, ‘‘या पक्षाच्या सरकारमुळे छत्तीसगडमध्ये धर्मांतर वाढले आहे. राज्य घटनेने स्वतःच्या आवडीनुसार धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. गरीब आदिवासींचे धर्मांतर करणे राज्याच्या हिताचे नाही. यामुळे छत्तीसगडमधील घराघरांत, गावागावांमध्ये संघर्ष सुरू आहे. कायदा-सुव्यवस्था खालावली आहे.’’

आमचे सरकार कोणाच्याही धार्मिक गोष्टींत हस्तक्षेप करणार नाही, मात्र कोणत्याही सरकारने धर्मांतराला प्रोत्साहन दिल्यास ते रोखण्यासाठी भाजपकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शहा यांनी दिला.

भूपेश बघेल हे काँग्रेसचे ‘प्रीपेड मुख्यमंत्री’ आहेत आणि जर ते पुन्हा सत्तेवर आले तर त्यांच्या पक्षाकडून (एटीएम कार्डप्रमाणे) त्यांचा वापर केला जाईल. यातून राज्यातील सर्व पैसा दिल्लीला नेला जाईल, असा आरोप करीत भूपेश बघेल हे लांगूनचालनाच्या राजकारणात गुंतले असून त्यांची उलट गणती सुरू झाली आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

home minister amit shah
Amit Shah: सहकार संदर्भहीन होतोय हा गैरसमज डोक्यातून काढा, तो आणखी तेजाने उजळणार; अमित शाहांना विश्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.