Amit Shah Video : ''DMK सरकार देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार'', अमित शाहांचा CM स्टॅलिन यांच्यावर जोरदार हल्ला

Amit Shah
Amit Shahesakal
Updated on

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तमिळनाडूमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि त्यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी शाहांनी भ्रष्टाचाराचे जुने मुद्दे उपस्थित केले.

अमित शाह बोलतांना म्हणाले की, देशामध्ये सगळ्यात भ्रष्ट सरकार कोणतं असेल तर ते डीएमके सरकार आहे. मंत्रिमंडळातले मंत्री करोडो रुपयांचे घोटाळे करीत आहे. घोटाळ्यांमुळे मंत्र्याला ईडीने अटक केली आहे. आजही जेलमध्ये असतांना त्यांना मंत्री पदावर कायम ठेवलं जात आहे. जे जेलमध्ये आहेत ते मंत्री राहू शकतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Amit Shah
Kirit Somaiya : ''बीभत्स वर्तणूक, विकृत वृत्ती... किरीट सोमय्यांवर देवाची काठी पडली'' विधानसभेत वायकर संतापले

पुढे बोलतांना शाह म्हणाले की, अशा भ्रष्ट लोकांचा राजीनामा घेतला पाहिजे की नाही? परंतु मुख्यमंत्री स्टॅलिन राजीनामा घेऊ शकत नाहीत. कारण राजीनामा दिला तर त्यांचे सगळे राज ते उघड करतील, अशी भीती आहे. तमिळ जनतेला मी आठवण करुन देतो की, काँग्रेस-यूपीएच्या काळात तमिळींचा नरसंहार श्रीलंकेत झाला होता. त्याला डीएमके आणि काँग्रेस जबाबदार आहे.

Amit Shah
Volcanic Eruption : पृथ्वीच्या दिशेने येत असलेला धूमकेतू वाटेतच फुटला, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाखो किमीवर पसरला वायू

स्टॅलिन यांना उद्देशून बोलताना अमित शाह म्हणाले की, नाव बदलून काहीही होत नाही. जसंही तुम्ही लोकांसमोर जाता तसं लोकांना टू जी घोटाळा आठवतो, कॉमन वेल्थ घोटाळा आठवतो, तुम्ही जनतेच्या समोर जाता तेव्हा कोळसा घोटाळा लोकांना आठवतो, चॉपर स्कॅम लोकांना आठवतो.. तुम्ही भ्रष्ट आहात, असा आरोप अमित शाहांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()