Amit Shah on Kejriwal's bails: 'केजरीवाल यांना विशेष वागणूक मिळाली...', सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जामिनावर अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah on Kejriwals bails: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन विशेष वागणूक असल्याचे म्हटले आहे.
Amit Shah on Kejriwals bails
Amit Shah on Kejriwals bailsEsakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन विशेष वागणूक असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले, 'मला असं वाटतंय हे रूटीन जजमेंट नाही. या देशातील बरेच लोक मानतात की, त्यांना विशेष वागणूक मिळाली आहे.

तिहारमध्ये कॅमेऱ्यांच्या प्रश्नावर अमित शहांनी दिलं हे उत्तर

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी तुरुंगात छुपे कॅमेरे लावल्याच्या केजरीवाल यांच्या आरोपाबाबत विचारले असता, अमित शाह म्हणाले, 'तिहार त्यांच्या (दिल्ली सरकार) प्रशासनाच्या अंतर्गत आहे. ते खोटे बोलत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाचा दिल्ली तुरुंग प्रशासनाशी काहीही संबंध नाही.'

Amit Shah on Kejriwals bails
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 10 मे रोजी तिहारमधून सोडण्यात आले

२१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आणि तिहार तुरुंगात बंद असलेल्या अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 10 मे रोजी सोडण्यात आले. 4 जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जर इंडिया आघाडीला बहुमत मिळाले तर अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येतील, असे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत केजरीवाल यांच्या विधानालाही अमित शहा यांनी उत्तर दिले.

Amit Shah on Kejriwals bails
Unique Marriage : तीस वर्षांपूर्वी मृत झालेल्या मुलीसाठी वर संशोधन करतंय कुटुंब; वरासाठी दिली जाहिरात!

केजरीवाल यांच्या वक्तव्याला न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगत अमित शाह म्हणाले, 'माझा विश्वास आहे की हा स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. अरविंद केजरीवाल असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की, कोणी जिंकले तर तो दोषी असला तरी सर्वोच्च न्यायालय त्याला तुरुंगात पाठवत नाही. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जामीन देणाऱ्या न्यायाधीशांना त्यांच्या निकालाचा कसा वापर किंवा दुरुपयोग होत आहे याचा विचार करावा लागेल.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 2 जूनपर्यंत तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण करावे लागणार असल्याची माहिती आहे. जामीन निर्देशानुसार केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सचिवालयात जाऊ शकत नाहीत. केजरीवाल यांना त्यांच्या प्रकरणावर बोलण्यासही मनाई करण्यात आली आहे. याशिवाय ते कोणत्याही साक्षीदाराशी बोलू शकत नाही.

Amit Shah on Kejriwals bails
Accident News: कार्यक्रमावरून घरी परतत असताना भीषण अपघात; पोलीस कॉन्स्टेबलसह ८ जणांचा जागीच मृत्यू, १ जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.