Amit Shah BSF: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केली बीएसएफची स्तुती; म्हणाले,'पाकिस्तान सीमेच्या रक्षणाची जबाबदारी...'

बीएसएफ या राखीव दलावर पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांना लागून असणाऱ्या भारतीय सीमेच्या रक्षणाची जबाबदारी आहे.
BSF
BSFgoogle
Updated on

Border Security Force: प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाच्या सेनेवर गर्व आहे. भारतीय थलसेना, नौसेना आणि वायुसेना देशाला येणाऱ्या प्रत्येर अडचणीच्या काळात मार्ग काढतात. मात्र, असेही काही निमलष्करी दल आहेत, जे भारतीय सेनेच्या खांद्याला खांदा लावून देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची बाजी लावतात. अशा निमलष्करी दलांमधील बीएसएफ म्हणजे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स हे एक राखीव दल आहे.

या राखीव दलावर पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांना लागून असणाऱ्या भारतीय सीमेच्या रक्षणाची जबाबदारी आहे. या बीएसएफचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कौतुक केलंय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "बीएसएफवर पाकिस्तान आणि बांगलादेश सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. बीएसएफ दोन्ही सीमांवर चांगलं लक्ष्य ठेवते. सर्व राखील पोलीस दलांमध्ये, बीएसएफ असं एकमेव दल आहे, जे पाणी, जमिन आणि आकाश सुरक्षित ठेवण्याची क्षमता आहे."

बॉर्डर सेक्युरिटी फोर्सची स्थापना १ डिसेंबर १९६५ रोजी भारत-विरुद्ध पाकिस्तान युद्धाच्या धर्तीवर करण्यात आली होती. १९७१मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात बीएसएफनेही आपले शौर्य दाखवले होते. बीएसएफमध्ये सध्या २लाख ६५ हजारांपेक्षा जास्त जवान आहेत

BSF
Surgical Strike in Manipur: मणिपूरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक' करा; भाजपच्या मित्रपक्षाची खळबळजक मागणी

बीएसएफबरोबरच भारतात आणखी निमलष्करी दल आहेत, जे युद्धकाळात भारतीय सैन्याची ताकद वाढवू शकतात. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्स (आयटीबीपी), सीमा सुरक्षा बल (एसएसबी), आसाम रायफल्स, सीआय़एसएफ यांचा समावेश आहे.

BSF
Govt Decision: कोविड काळात काम केलेल्या परिचारिकांना सरकारचं गिफ्ट; आरोग्य विभागाच्या सेवेत कायम होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.