Amit Shah on Arvind Kejriwal : भाजपचं सरकार आलं तर पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होणार नसून अमित शाह होणार आहेत, त्यामुळे तुमचं मत अमित शाहांना जाणार आहे.. असं विधान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. त्यांच्या या दाव्याला अमित शाहांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना त्यांच्या वाढत्या वयामुळे निवृत्ती दिली होती. आता खुद्द नरेंद्र मोदी हेसुद्धा ७५ वर्षांचे होत आहेत. आता मी भाजपला विचारतो की, तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? मुळात मोदी हे स्वतःसाठी नव्हे तर अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत, असा दावा केजरीवालांनी केला होता.
अमित शाहांचं प्रत्युत्तर
हैदराबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरविंद केजरीवालांचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, मी अरविंद केजरीवाल आणि इंडी अलायन्सला सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत आहेत, याचा आनंद साजरा करण्याची गरज नाही. भाजपच्या संविधानात कुठेही लिहिलं नाही की, मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत. ते पुन्हा पंतप्रधान होणार आणि आपली टर्म पूर्ण करणार आहेत.
तेलंगणात भाजप सरकार आल्यानंतर मुस्लिम आरक्षण संपवणार
अमित शाह म्हणाले की, काँग्रेसवाले लोक सीएएला विरोध करत आहेत, काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, त्याला विरोध करत आहेत, सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, काँग्रेस सरकारने तेलंगणात ४ टक्के मुस्लिम आरक्षण आणलं आहे. यामुळे ओबीसी, एससी, एसटी यांना धोका होऊ शकतो. तेलंगणात भाजप सरकार आल्यानंतर आम्ही मुस्लिम आरक्षण समाप्त करुन टाकू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.