Amit Shah : देशाला तंत्रज्ञानात नंबर वन बनवू : शहा

हुबळीत ‘बीव्हीबी’चा अमृतमहोत्सव; स्टेडियमचे उद्घाटन
amit Shah statement Make country number one in technology
amit Shah statement Make country number one in technologysakal
Updated on

बंगळूर : तंत्रज्ञानात आपला देश नंबर वन झाला पाहिजे. तंत्रज्ञानात भारताला जगात प्रथम स्थानावर पोहोचविणे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी तसा निर्धार केला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

शहा यांनी हुबळी येथील केएलई संस्थेच्या बीव्हीबी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी २५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या विशाल इनडोअर स्टेडियमचेही त्यांनी उद्‍घाटन केले. शहा पुढे म्हणाले, ‘‘जगात भारताचे स्थान अग्रेसर आहे. भारताची ताकद जगाला दाखवायची आहे. तरुणांनी महान भारताचे स्वप्न साकार केले पाहिजे. तंत्रज्ञानात भारत पहिल्या क्रमांकावर असावा. हे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे.

देशासाठी जगा आणि देशाला जगात पहिल्या क्रमांकावर आणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना विविध क्षेत्रात पुढे येण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याचा लाभ घ्या. देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती म्हणून विकसित होण्यासाठी देशातील तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे.’’ तिरुपतीच्या विश्व धर्म चेतना मंचचे ब्रह्मश्री गुरुदेव स्वामीजी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आदी उपस्थित होते.

केएलई संस्थेचा गौरव

शहा यांनी केएलई संस्थेने शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव केला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात बीव्हीबी महाविद्यालयाचाही अमृत महोत्सव साजरा होत आहे, हा एक चांगला योग असल्याचे शहा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.