Amit Shah : ..त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं; अमित शहांनी सांगितला 'किस्सा'

'आसाममध्ये सलग दोन वेळा भाजपचं सरकार स्थापन होईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.'
Amit Shah Visit Assam
Amit Shah Visit Assamesakal
Updated on
Summary

'आसाममध्ये सलग दोन वेळा भाजपचं सरकार स्थापन होईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.'

Amit Shah In Assam : गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतंच बेलटोला, गुवाहाटी इथं पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केलं. यादरम्यान अमित शहांनी जनतेलाही संबोधित केलं.

अमित शहांनी (Amit Shah) त्यांच्या भाषणात सुरुवातीच्या काळातील एक किस्साही सांगितला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या विरोधात निदर्शनं करत असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते हितेश्वर सैकिया (Hiteswar Saikia) यांच्या कार्यकाळात ABVP कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा किस्सा अमित शहांनी सभेत शेअर केला.

Amit Shah Visit Assam
Shiv Sena : शिवसेना संकटात असताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आम्ही युतीसाठी..

अमित शहा म्हणाले, मी एकदा अभाविपच्या कार्यक्रमात इथं आलो होतो. त्यावेळी आम्हाला हितेश्वर सैकियानं खूप मारहाण केली होती. आम्ही त्यावेळी घोषणा देत आसामचे रस्ते सुनसान आहेत, इंदिरा गांधी खुनी आहेत, असं म्हटलं होतं. याच आसाममध्ये सलग दोन वेळा भाजपचं सरकार स्थापन होईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं असं त्यांनी नमूद केलं.

Amit Shah Visit Assam
Karnataka : SC/ST आरक्षणाबाबत भाजप सरकारचा मोठा निर्णय; 50 टक्के कोटा मर्यादा रद्द करण्याची शक्यता!

राहुल गांधींची खिल्ली उडवत अमित शहा म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींचा अजेंडा होता की ते सत्तेत आले तर ईशान्येतून AFSPA हटवला जाईल. पण, मी म्हणालो होतो.. आम्ही आधी ईशान्येत शांतता प्रस्थापित करू आणि नंतर AFSPA हटवू, असं त्यांनी स्पष्ट केलं. आसामची भूमी गेली अनेक वर्षे काँग्रेसनं दहशतवाद, विघटन, आंदोलनं आणि संपाची भूमी बनवली आहे. इथं आजपर्यंत विकास नव्हता, शिक्षण नव्हतं, शांतता नव्हती. आज मला आनंद आहे की, 2014 पासून संपूर्ण ईशान्य भाग विकासाच्या मार्गावर आहे. आता ईशान्येचा विकास आणि ईशान्येतील भाजपचा विकास हे दोन्ही समांतर चालू आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()