नवी दिल्ली : लखीमपूर खिरीला (Lakhimpur Khiri Violence) जाणारे राहुल आणि प्रियांका काश्मीरला का गेले नाहीत? या भाजपच्या आक्षेपाला काँग्रेसच्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिलंय. काश्मीरमध्ये हिंसा घडत असताना गृहमंत्री अमित शहा मात्र गरबा खेळण्यात व्यस्त होते, असा आरोपी देखील त्यांनी केला आहे.
''हिंसाग्रस्त कुटुंबियांना आपलं भेटणं हे राहुल गांधी यांच्या आदेशानुसारच होतं. पक्षाच्या कार्यक्रमासाठी भुवनेश्वरमध्ये असताना राहुल यांनी आपल्याला फोन करून काश्मीरला जाण्यास सांगितलं होतं. जम्मू काश्मीरच्या प्रभारी म्हणून काँग्रेसच्या प्रतिनिधी या नात्याने मी पीडित कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेले. मात्र, अमित शहा कुठे होते? जम्मू काश्मीरमध्ये हिंसा होत असताना अमित शाह हे मात्र नवरात्रीचा गरबा खेळत होते. मग त्यांना हा प्रश्न का विचारला जात नाही?'' असा रोकडा सवालही रजनी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.
''काश्मीर खोरं पुन्हा अशांत होऊ लागलं असून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांचे केलेले हत्याकांड मन विषण्ण करणारे आहे. ३७० कलम हटविल्यानंतर सारे काही सुरळीत असल्याचा दावा करणारे केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनच या हिंसेला जबाबदार आहे, असा आरोप रजनी पाटील यांनी केला.
रजनी पाटील यांनी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या मख्खनलाल बिंद्रू आणि शिक्षिका सुपेंद्र कौर यांच्या कुटुंबीयांची तर हल्ल्यात दिवंगत शिक्षक दीपकचंद यांच्या कुटुंबीयांची जम्मू येथे नुकतीच भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी दिल्लीत येऊन त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
''आतापर्यंत शिक्षकांवर कधीही हल्ले झालेले नव्हते. या विशिष्ट उद्देशाने केलेल्या हत्या आहेत. यामागची नेमकी कारणे शोधावी लागतील. मात्र, कलम ३७० हटवल्यानंतर सारे काही सुरळीत झाल्याचे दावे केंद्राकडून केले जात होते, असे असताना काश्मीरमध्ये असे भयाचे वातावरण निर्माण होणं, लोकांच्या मनात भयामुळे स्थलांतराची भावना निर्माण होणे हे केंद्र सरकारचे, गृह मंत्रालयाचे अपयश आहे. केंद्राने ही जबाबदारी स्वीकारायला हवी. लोकांना त्यांनी सुरक्षितता द्यावी, '' असं रजनी पाटील यांनी सांगितलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.