अमित शाह कठोर पावले उचलणार?; अजित डोवाल यांनी घेतली भेट

Amit Shah will take stern action against killings in Kashmir
Amit Shah will take stern action against killings in KashmirAmit Shah will take stern action against killings in Kashmir
Updated on

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी गुरुवारी (ता. २) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यांनी काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांबाबत चर्चा केली. शुक्रवारी (ता. ३) होणाऱ्या बैठकीत जम्मू आणि काश्मीरच्या एकूण आढावा दरम्यान गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) नागरी आणि पोलिस प्रशासनाला ठोस निर्देश देतील, अशी चर्चा आहे. (Amit Shah will take stern action against killings in Kashmir)

जम्मू आणि काश्मीरमधील (Kashmir) कुलगाम येथे गुरुवारी बँक व्यवस्थापकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बँकेच्या शाखेत घुसल्यानंतर दहशतवाद्याने (Terrorist) बँक व्यवस्थापक विजय कुमार यांच्यावर गोळी झाडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी शाखेत घुसून गोळीबार करून पळून गेल्याचे दिसत आहे. विजय कुमार यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

Amit Shah will take stern action against killings in Kashmir
केएफएफने स्वीकारली बँक कर्मचाऱ्याच्या हत्येची जबाबदारी; म्हणाले...

जम्मूतील हिंदू शिक्षिका रजनी बाला यांची कुलगाममधील शाळेबाहेर दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर दोनच दिवसांनी हा हल्ला झाला आहे. कुलगामला लागून असलेल्या शोपियान जिल्ह्यात दोन मोठ्या घटनांनंतर २४ तासांत बँक व्यवस्थापकाची हत्या करण्यात आली. फारुख अहमद शेख नावाचा एक नागरिक काल सायंकाळी त्याच्या घरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाला.

दुसऱ्या एका घटनेत गुरुवारी सकाळी त्यांच्या वाहनाचा स्फोट होऊन तीन जवान जखमी झाले. यातील एक जवान गंभीर जखमी झाला आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, तिन्ही जवानांनी दहशतवादविरोधी (Terrorist) कारवाईसाठी खासगी वाहन घेतले होते. त्यांनी सांगितले की, ते नेमलेल्या भागाकडे जात असताना हा स्फोट झाला. गुरुवारी झालेल्या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी हजेरी लावली.

Amit Shah will take stern action against killings in Kashmir
हार्दिक पटेलवर काँग्रेसचा गंभीर आरोप; आम्ही सन्मान दिला तर...

प्रशासनाला ठोस निर्देश देतील

उद्या दुपारी जम्मू आणि काश्मीरच्या एकूण आढावा दरम्यान गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) नागरी आणि पोलिस प्रशासनाला ठोस निर्देश देतील. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval), यूटीचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, सर्वोच्च गुप्तचर प्रमुख, यूटीचे मुख्य सचिव आणि डीजीपी उपस्थित राहणार आहेत. केंद्रशासित प्रदेशात अल्पसंख्याक समुदाय अधिक सुरक्षित आहे आणि पाकिस्तान आधारित दहशतवादी गटांनी त्यांना लक्ष्य केले जाणार नाही याची खात्री करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.