भारत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात मोठी झेप घेण्यास तयार आहे आणि त्याला महान राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. परकीय शक्ती भारताला त्यांच्या अधिपत्याखाली ठेवू शकतात कारण ते भारतीयांमध्ये न्यूनगंड निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत, जे खरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मुळापासून उपटून टाकावे लागेल असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे.
दूरदर्शनच्या 'स्वराज: भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा'च्या विशेष स्क्रीनिंगच्या वेळी गृहमंत्र्यांनी हे सांगितले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या मालिकेचे 75 भाग बनवण्याचे काम दूरदर्शनने केले आहे. स्वातंत्र्याच्या शूर सुपुत्रांच्या अमर बलिदानाला समर्पित ही मालिका 14 ऑगस्टपासून दूरदर्शनवर हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणार आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी शाह यांचे आधुनिक युगातील कुशल रणनीतिकार आणि 'चाणक्य' असे वर्णन केले, ज्यांनी राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करताना कलम 370 आणि 35A मधून मुक्तता मिळवली. ठाकूर म्हणाले, सरदार पटेल यांनी भारताला अखंड ठेवल्याचे आपण ऐकले होते. मला अमित शहांमध्ये सरदार पटेलांचे प्रतिबिंब दिसते. पटेलांनी देश एकसंध ठेवला आणि अमित शहा तो मजबूत करत आहेत.
इतिहासाचा अभिमान असायला हवा
अमित शहा म्हणाले की, दूरदर्शन आणि आकाशवाणीने वेळोवेळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देश ढवळून काढण्याचे, भावना जोपासण्याचे आणि शेवटी सर्जनशील शक्ती गोळा करण्याचे काम केले आहे. देशाचे भविष्य महान बनवायचे असेल तर भारताच्या महान इतिहासाचा अभिमान तरुण पिढीमध्ये निर्माण केला पाहिजे.
स्वराज शब्दाचा सांगितला अर्थ
अमित शहा म्हणाले की, भारतातील स्वराज या शब्दाचा अर्थ केवळ स्वराज्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण भारताला स्वतंत्र करून स्वतःच्या पद्धतीवर चालवणे हा स्वराज शब्द आहे. स्वराज्यात स्वभाषा, स्वधर्म, स्वसंस्कृती आणि स्वतःच्या कलाही येतात. जोपर्यंत आपण स्वराज्याच्या भावनेत अक्षरशः रंगत नाही तोपर्यंत भारत खर्या अर्थाने स्वराज्य मिळवू शकत नाही. शताब्दी वर्षात आपण आपल्या भाषा वाचवू शकलो नाही, इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकलो नाही आणि हजारो वर्षांपासून चालत आलेली संस्कृती वाचवू शकलो नाही, तर आपण स्वराज्य मिळवू शकू का? असंही ते यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.