1999 पासून आतापर्यंतच्या चक्रीवादळाच्या घटनांवर एक नजर

amphan, cyclone
amphan, cyclone
Updated on

नवी दिल्ली : देश कोरोनाजन्य परिस्थितीमुळे हैराण असताना पश्चिम बंगाल आणि ओडिसा समुद्र किनाऱ्यावर आणखी एक संकट येऊन धडकले आहे. जवळपास 21 वर्षानंतर अम्फानच्या रुपातील चक्रीवादळाने भारताच्या पूर्वेकडील परिसराला दणका दिलाय. 1999 मध्ये याठिकाणी आलेल्या चक्रीवादळामुळे जवळपास 10 हजार लोकांनी आपला जीव गमावला होता. 2018 आणि 2019 मध्ये लागोपाठ चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. पण 1999 मधील चक्रीवादळाची तीव्रता भयावह होती. ओ-5बी नावाच्या चक्रीवादळाने होत्याचे नव्हते केले होते. या चक्रीवादळापूर्वी 1885 मध्ये मोठ्या चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. 

इतिहासातील धक्कादायक घटनातून सरकारने खूप काही शिकले असून आशा संकटाचा सामना करण्यासाठी वेळोवेळी केलेल्या सुधारणामुळे सध्याच्या परिस्थितीही नियंत्रणात राखण्यात आपल्याला यश आलंय असे म्हणता येईल. एक  नजर टाकूयात आतापर्यंतच्या चक्रीवादळावरील घटनांवर...

मागील वर्षी मे 2019 मध्ये फॅनी चक्रीवादळाचा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले होते. 1999 च्या चक्रीवादळाच्या तुलनेत यावेळी ओडीसामध्ये कमी नुकसान झाले होते. तज्ज्ञांच्या मतानुसार, सरकार अनेक लोकांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले होते. आपातकालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी त्यावर त्वरित केलेल्या उपाय आणि प्रभावी रणनितीमुळे चक्रीवादळासारख्या तडाख्यातून होणारी हानी कमी करण्यात आपल्याला यश मिळाल्याचीही चांगलीच चर्चा यावेळी रंगली होती.  2019 च्या चक्रीवादळाच्या घटनेवेळी अवघ्या 48 तासात सरकारने 12 लाख लोकांना बाहेर काढले होते. हा एक विक्रमच आहे. 

1999 मध्ये आलेल्या चक्रीवादळाच्या आपतकालीन परिस्थितीतील गंभीर घटनेनंतर राज्य आपातकालीन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर 2001 मध्ये ओडिसा डिजास्टर रॅपिड एक्शन फोर्सची स्थापना करण्यात आली.  हवामान विभागाने बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाचे तंतोतंत अनुमान लावण्यासाठीची यंत्रणाही उभी केली.  

कधी कोणत्या चक्रीवादळाचा फटका बसला 

#1999 मध्ये ओ-5बी या चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत केले होते. यात जवळपास 10 हजार जणांनी आपला जीव गमावला होता. 29 ऑक्टोबर 1999 मध्ये ओ-5बी नावाचे चक्रीवादळ ओडीसाच्या किनाऱ्यावर धडकले होते. याचा  14,643 गावांना फटका बसला होता.  

#2019 फॅनी चक्रीवादळाने दणका दिल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी जवळपास 64 लोकांनी आपला जीव गमावला होता. 3 मे 2019 रोजी भारताच्या किनारपट्टीवर धडकलेल्या वादळाला भारतातील शक्तीशाली चक्रीवादळापैकी एक गणले जाते. 20 वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा फटका बसला होता.  

अन्य छोटी-मोठी वादळे

#9 नोव्हेंबर 2019 मध्ये  बंगालच्या उपसागरामध्ये बुलबुल चक्रिवादळ तयार झाले होते. या घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाला होता. एवढेच नाही तर 1.30 लाख घरेही उध्वस्त झाली होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले होते.  

#2018 मध्ये बंगालच्या उपसागरात तितली चक्रीवादळ निर्माण झाले होते. या चक्रीवादळाने आंध्र प्रदेश, ओडीसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आंध्र प्रदेशात आठ लोकांनी आपला जीव गमावला होता.  

# नोव्हेंबर 2017 मध्ये दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन ओखी चक्रीवादळ निर्माण झाले होते. यात  365 लोक बळी पडले होते. 

#2014 मध्ये आंध्र प्रदेश आणि ओडिसाला हुदहुद चक्रीवादळाचा फटका बसला होता. यात 24 लोकांचा मृत्यू झाला होता तर सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.  

#2013 मध्ये फॅलिन चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यावर धडकले होते. यात 30 लोकांचा मृत्यू झाला होता. भारतातील सर्वाधिक मोठ्या घटनेपैकी एक घटना आहे. 

#2009 मध्ये सुंदरवनमध्ये 120 किमी प्रति तास इतक्या वेगाने आलेल्या आयला चक्रीवादळाने थैमान घातले होते. यात 100 लोकांनी जीव गमावला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.