अमृतपाल, इंजिनिअर राशिद बनले खासदार; लोकसभाध्यक्षांच्या दालनामध्येच उरकला शपथविधी

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात ही शपथ देण्यात आली. अर्थात, याबाबतची कोणतीही छायाचित्रे अथवा व्हिडिओ लोकसभा सचिवालयातर्फे जारी करण्यात आलेले नाहीत.
Amritpal Singh Engineer Rashid take oath as Lok Sabha MP marathi news
Amritpal Singh Engineer Rashid take oath as Lok Sabha MP marathi news
Updated on

नवी दिल्ली, ता. ५ ः खलिस्तानी फुटीरवादी चळवळीचे समर्थक आणि लोकसभा निवडणुकीत पंजाबमधून विजय मिळविणारे अमृतपालसिंग त्याचप्रमाणे काश्मीरमधील फुटीरतावादी नेते म्हणून ओळखले जाणारे नवनिर्वाचित खासदार इंजिनिअर राशिद यांना आज लोकसभेच्या खासदारकीची शपथ देण्यात आली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात ही शपथ देण्यात आली. अर्थात, याबाबतची कोणतीही छायाचित्रे अथवा व्हिडिओ लोकसभा सचिवालयातर्फे जारी करण्यात आलेले नाहीत.

‘वारिस पंजाब दे’ चे प्रमुख असलेल्या अमृतपाल सिंग यांना अटक करण्यात आल्यानंतर आसामच्या दिब्रुगड येथील तुरुंगात सव्वावर्षांपासून ठेवण्यात आले आहे. अमृतपाल सिंग यांना चार दिवसांची रजा (पॅरोल) कारागृह प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत अमृतपालसिंग यांनी तुरुंगातूनच खडूरसाहिब मतदारसंघाची निवडणूक लढली होती. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कुलबीरसिंग झिरा यांचा सुमारे दोन लाख मतांनी पराभव केला होता.

Amritpal Singh Engineer Rashid take oath as Lok Sabha MP marathi news
Indian Team: भारतीय संघात 125 कोटी रुपयांचे वितरण कसे होणार? टॅक्समध्ये किती पैसे कापले जाणार? जाणून घ्या

पुन्हा तुरुंगात रवानगी

पंजाब पोलिसांचे आठ सदस्यीय पथक काल (ता. ४) दिब्रुगड तुरुंगात पोहोचले होते. या पथकासोबत विशेष विमानाने अमृतपालसिंग यांना आज दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर संसदेमध्ये लोकसभाध्यक्षांच्या दालनात त्यांना खासदारकीची शपथ देण्यात आली. त्यासाठी अमृतपाल यांचे आई-वडील, काका दिल्लीत दाखल झाले होते. अर्थात, पत्नी किरणदीप कौर दिब्रुगडमध्येच थांबल्या आहेत. शपथविधी आटोपल्यानंतर कुटुंबीयांच्या भेटीगाठी झाल्यानंतर अमृतपालसिंग यांना परत दिब्रुगडच्या तुरुंगात पाठविण्यात आले.

Amritpal Singh Engineer Rashid take oath as Lok Sabha MP marathi news
Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

राशिद यांनाही मिळाली सुटी

दिल्लीच्या तिहार तुरुंगात अटकेत असलेले काश्मिरी नेते इंजिनिअर राशिद यांनीही आज खासदारकीची शपथ घेतली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिलेल्या मंजुरीनंतर राशिद यांना संसद सदस्यत्वाच्या शपथेसाठी दोन तासांची सुटी देण्यास हिरवा झेंडा दर्शविण्यात आला होता. शपथ घेतेवेळी पत्नी, दोन मुले, मुलगी यांच्यासह अन्य नातेवाइकही उपस्थित होते. इंजिनिअर राशिद यांनी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. संसदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनादरम्यान दोन्ही खासदारांना शपथ घेता आली नव्हती. नवनिर्वाचित खासदारांसाठी ६० दिवसांच्या आत शपथ घेणे बंधनकारक असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.