पैगंबरांची निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद योग्यच; AMU च्या विद्यार्थी नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

FARHAN JUBERI
FARHAN JUBERI
Updated on

नवी दिल्ली- फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची कट्टर इस्लामबाबतची भूमिका आणि त्यानंतर फ्रान्समध्ये झालेले दहशतवादी हल्ले यामुळे जगभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. मॅक्रॉन यांच्या इस्लामसंबंधी वक्तव्याचे पडसाद मुस्लीम राष्ट्रांमध्ये उमटत आहेत. अनेक लोक रस्त्यावर उतरुन मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. भारतातही मुंबई आणि भोपाळमध्ये याविरोधात निदर्शने झाली होती. त्यातच अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीचा Aligarh Muslim University (AMU) विद्यार्थी फरहान जुबेरीने Farhan Zuberi प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा अपमान करणाऱ्याचा शिरच्छेद करणे योग्य असल्याचे म्हटलं आहे. 

जुबेरी याने 29 ऑक्टोबर रोजी केलेल्या एका पोस्टमधून उघडउघड मोहम्मद पैगंबराचा अपमान करणाऱ्यांची हत्या करण्याची चिथावणी दिली होती. जर कोणी निंदा केली, तर आम्ही त्याचा शिरच्छेद करु. इस्लामचा पाया कलमा आहे (ला इला इलल्ला...मुहम्मद रसुलल्लाहा). जर आमच्या निर्मात्याची कोणी निंदा करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, असं जुबेरी व्हिडिओमध्ये म्हणत आहे.  

फरहान जुबेरीला Times Now च्या डिबेटमध्ये गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. यावेळी त्याने केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावेळी जुबेरी म्हणाला की, मी माझ्या वक्तव्याचे पूर्ण समर्थन करतो. आमच्या प्रेषितांचा अपमान करण्याचे धाडस कोणी कसं करु शकतो? कोणी असं का करेल?. फरहान जुबेरी हा अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचा Aligarh Muslim University Student Union (AMUSU) कॅबिनेट सदस्य आहे. जुबेर याच्या या वादग्रस्त वक्तव्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, MIMIM ने जुबेरी याच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटलं आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.