आजपासून प्लास्टिक स्ट्रॉवर बंदी

प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
amul
amulsakal
Updated on

आजपासून प्लास्टिक स्ट्रॉवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अमूलसह पेप्सिको, कोका-कोला यांची बहुतांश प्रोडक्ट्स प्लास्टिकच्या स्ट्रॉसह पॅक करून ग्राहकांना दिले जातात. मात्र प्लास्टीक स्ट्रॉवर बंदी आल्यामुळे याचा मोठा फटका या कंपनीना बसणार आहे. प्रदूषणाला आळा बसावा, या हेतूने प्लास्टीक स्ट्रॉवर बंदी घालण्यात आली आहे.

amul
लग्न ठरवून परतणाऱ्यांचा अपघात; ८ जण घटनास्थळीच ठार

1 जुलैपासून प्लास्टिक स्ट्रॉवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याचं सरकारने आधीच जाहीर केलं होतं सरकार प्लास्टिक स्ट्रॉवर पूर्णपणेबंदी घालण्याच्या तयारीत होते तेव्हाच अमूल या डेअरी ग्रुपने सरकाराल पत्र लिहिले होते. प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली होती.

विशेष म्हणजे प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदीवर आक्षेप नोंदवणारी अमूल पहिली कंपनी नाही. याआधीही अनेक कंपनीनी यावर आक्षेप नोंदवला होता. मात्र सरकारने त्यांची ही मागणी मान्य केली.

अमूलने सरकारला लिहिलेल्या पत्रात लिहिले होते की, “प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्यात यावी. या निर्णयामुळे देशातील शेतकरी आणि दूध उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे.” पुढे अमूलने पत्रात म्हटलय, “प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदीचा निर्णय काही दिवसांसाठी वाढवल्यास देशातील 10 कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळेल कारण या स्ट्रॉमुळे दुधाचा खप वाढतो.”

amul
जस्टिन बिबरची अवस्था वाईट.. चेहऱ्याला झाला अर्धांगवायू , डोळाही उघडेना..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.