आपल्या अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. महिलांच्या आयडॉल असणाऱ्या स्वराज यांचा विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री हा प्रवास नुसताच संघर्षमय नसून थक्क करणारा असा आहे. स्वराज यांनी आपल्या चार दशकाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मान-सन्मान पटकावतानाच अनेक विक्रमही नोंदविले आहेत.
आज सुषमा स्वराज यांचा स्मृतीदिन आहे.यानिमित्ताने देशातील अनेक लोक आपापल्या परीने त्यांची आठवण करत आहे. त्यांच्याशी संबंधित एक किस्साही पीएम नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे.
चला तर मग बघू या कोणता आहे तो किस्सा..
सध्या मी एक राजकीय कार्यक्रम आटोपून परत येत आहे. आज सुषमाजींची जयंती आहे. मला अचानक त्याच्याशी संबंधित एक खूप जुना प्रसंग आठवला, म्हणून वाटलं तुमच्यासोबत तो प्रसंग शेअर करावा.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, जेव्हा मी भाजपमध्ये संघटक म्हणून काम करत होतो आणि सुषमाजी गुजरातमध्ये निवडणूकीच्या दौऱ्यावर आल्या होत्या. तेव्हा त्या माझ्या मुळगावी म्हणजे वडनगर इथे जाऊन माझ्या आईला भेटल्या होत्या. त्यावेळी आमच्या कुटुंबात नुकताचं माझ्या भावाच्या मुलीला म्हणजे माझ्या पुतणीला मुलगी झाली होती.
ज्योतिषांनी नक्षत्र पाहून तिचे नाव शोधून काढले होते. घरच्यांनीही ठरवलं होतं की ते ज्योतिष जसं सांगतिल तसं करु या.पण जेव्हा सुषमाजी माझ्या आईला भेटल्य त्या भेटीनंतर माझ्या आईने मुलीचे नाव 'सुषमा' ठेवणार असल्याचे स्पष्ट सांगितले.मोदीजी पुढे म्हणतात की, माझी आई फार शिकलेली नाही आहे पण ती विचारांनी खूप आधुनिक आहे. मला आजही तो प्रसंग आठवतो, जेव्हा माझ्या आईने तिचा हा नाव ठेवण्याचा निर्णय सर्वांसमोर सांगितला होता.
सुषमाजींना आज त्यांच्या स्मृतीदिन विनम्र अभिवादन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.