Anant Ambani Pre-Wedding (Marathi News) : मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा प्री-वेडिंग सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जगभरातल्या थोरामोठ्यांनी या सोहळ्याला हजेरी लावेलली आहे. या सोहळ्याची चर्चा पाकिस्तानमध्ये झाली नसती तर नवलच.
पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी हिने म्हटलंय की, मुकेश अंबानी यांनी जेवढे पैसे आपल्या मुलाच्या लग्नात खर्च केले आहेत, तेवढ्यात पाकिस्तानच्या सगळ्या लोकांचे दोन-दोन, चार-चार वेळेस लग्न झाले असते. एक म्हण आहे की- बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना; आज तिच अवस्था पाकिस्तानची झाली आहे.
आरजू काझमी पुढे म्हणाली की, मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न भारतात होत आहे आणि पाकिस्तानात केवळ हीच बातमी चालत आहे. कुणी म्हणतंय आमूक एवढे खर्च झाले तर कुणी म्हणतंय तमूक एवढे पैसे खर्च झाले.
''या प्री वेडिंगमध्ये एक विशेष गोष्ट बघायला मिळाली की, भारतातील मोठमोठे अभिनेते, अभिनेत्री साधेपणाने बसमधून जात आहेत. जसे पाकिस्तानात वऱ्हाडी जातात. हे केवळ मुकेश अंबानी यांच्यामुळेच शक्य झालं.'' असं आरजू म्हणाली.
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये एकही पाकिस्तानी नाही
पाकिस्तानी पत्रकार आरजूने म्हटलं की, मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती ही की, या सोहळ्यासाठी कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. तिने पाकिस्तानवर टीका करत अशा पद्धतीची विधानं केली आहेत.
सांगितलं जातंय की, मुकेश अंबानी यांनी या इव्हेंटसाठी तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. पाकिस्तानचे लोक या रकमेला कधी पाकिस्तानी रुपयांमध्ये कन्व्हर्ट करुन बघतात तर कधी डॉलरशी तुलना करुन बघतात. मात्र सध्या पाकिस्तानात अंबानींच्या सोहळ्याचीच चर्चा आहे.
अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मार्क झुकरबर्ग पत्नी प्रिसिला चॅन सोबत भारतात आले आहेत. या जोडीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, फेसबुकचा संस्थापक झुकरबर्गची सध्याची एकूण संपत्ती $176.1 अब्ज आहे. या अफाट संपत्तीमुळे ते जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. तर भारतासह संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची सध्याची संपत्ती 117 अब्ज डॉलर्स आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 9व्या क्रमांकावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.