टयूनिशियातील एका खासगी प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या तीन अफ्रिकन हत्तींसाठी भारतीय भूमीत नवे जीवन मिळणार आहे. जामनगरच्या वनतारा वन्यजीव बचाव केंद्रात त्यांना आश्रय दिला जाणार आहे. दोन मादी व एक नर हत्ती, अच्ताउम, कानी आणि मिना, हे गेल्या २३ वर्षांपासून फ्रिगुइया पार्क येथे प्रदर्शनाचा भाग होते. परंतु आर्थिक अडचणींमुळे प्राणीसंग्रहालयाने त्यांची काळजी घेण्यासाठी वनताराशी संपर्क साधला.