मशिदीवर आढळल्या प्राचीन स्वस्तिकाच्या खुणा; पण मुस्लिमांच्या विरोधामुळे...

वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भागांचे व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.
Gyanvapi Masjid
Gyanvapi MasjidSakal
Updated on

वाराणसीमधील ग्यानवापी श्रृंगार कॉम्प्लेक्स परिसरातल्या ग्यानवापी मशिदीवर दोन स्वस्तिकांच्या खुणा आढळून आल्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान या खुणा आढळून आल्या असून सध्या त्याची व्हिडीओग्राफी करण्याचं काम सुरू आहे. शनिवारी झालेल्या निदर्शनांदरम्यान प्रशासनाने हे काम थांबवलं. त्यानंतर कोर्ट कमिशनरच्या टीममधील व्हिडिओग्राफर्सनी सांगितले की ते सर्वेक्षण करत असताना त्यांना मशिदीच्या बाहेर दोन फिकट स्वस्तिक दिसले. स्वस्तिक शक्यतो प्राचीन काळी काढलेले असावेत, असे ते म्हणाले.

मुस्लीम पुरुषांच्या विरोधामुळे वकिलांच्या टीमला मशिदीमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर शनिवारी ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील काही भागांची व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षण थांबवण्यात आलं. आदल्या दिवशी, वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भागांचे व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने नियुक्त केलेले अधिकारी आणि वकिलांच्या पथकाने शुक्रवारी परिसराची पाहणी केल्यानंतर या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Gyanvapi Masjid
कुतुब मीनारजवळील मशीद २७ मंदिर पाडून बांधली; पुरातत्वतशास्त्रज्ञाचा दावा

दिल्लीस्थित राखी सिंग, लक्ष्मी देवी, सीता साहू आणि इतर महिलांनी ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर ज्या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत त्यांची पूजा करण्याची परवानगी मागितल्याच्या याचिकेनंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण केले जात आहे.याचिकाकर्त्यांचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी म्हणाले की, मशिदी व्यवस्थापन समितीने केलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालय सुनावणी करत नाही आणि आदेश देत नाही तोपर्यंत मशिदीचे सर्वेक्षण केलं जाणार नाही.

Gyanvapi Masjid
मंदिर असो वा मशिद भोंगे उतरवलेच पाहिजेत; राकेश टिकैत यांचं समर्थन

चतुर्वेदी म्हणाले की, शनिवारी जेव्हा वकील आणि व्हिडिओग्राफरची टीम जवळ आली तेव्हा मुस्लीम समाजातील सुमारे शंभर पुरुषांनी मशिदीला वेढा घातला , त्यामुळे त्यांना सर्वेक्षण करता आले नाही. न्यायालय आता 9 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे आणि ते ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओग्राफी आणि सर्वेक्षण करण्यासाठी विशिष्ट आदेश मागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.