VIDEO: चंद्राबाबू नायडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुंगात रवानगी करताना भरपावसात कार्यकर्त्यांची गर्दी

former CM N Chandrababu Naidu was taken Prison judicial custody
former CM N Chandrababu Naidu was taken Prison judicial custody
Updated on

former CM N Chandrababu Naidu was taken Prison judicial custody

अमरावती- तेलगु देसम पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कडेकोट बंदोबस्तात त्यांना राजाहमुड्रे सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले. चंद्राबाबू २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असतील. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

चंद्राबाबू नायडू यांना 350 कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली होती. ईडीच्या तपासात हा घोटाळा सिद्ध झाल्याचं सांगण्यात आलंय. 241 कोटी रुपयांचा निधी शेल कंपन्यांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी 8 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

शनिवारी पहाटे ३ वाजता चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी एक पथक दाखल झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक आल्यावर तेथे जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच एसपीजी दलानेही नायडू यांना नियमानुसार सकाळी 5.30 वाजेपर्यंत अटक केली जाऊ शकत नाही, असे सांगून पोलिसांना परवानगी नाकारली. त्यानंतर अखेर सकाळी 6 वाजता चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या घरातून खाली बोलावून अटक करण्यात आली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.