हैदराबाद : आंध्रप्रदेशमधील राजकारण पुन्हा एकदा नाट्यमय वळणावर पोचले आहे. वायएसआर काँग्रेसच्या वार्षिक संमेलनामध्ये पक्षाच्या मानद अध्यक्ष वाय.एस. विजयलक्ष्मी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आंध्रमधील जनतेमध्ये एस. विजयलक्ष्मी या विजयाम्मा म्हणून प्रसिद्ध आहेत. दिवंगत वायएसआर यांच्या कन्या वाय.एस. शर्मिला यांच्यासोबत उभे राहण्याचा निर्णय विजयाम्मा यांनी घेतला आहे. मध्यंतरी जगनमोहन आणि शर्मिला यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी वेगळी राजकीय वाट निवडली होती.
वायएसआर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये विजयाम्मा यांनी ही घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी व्यासपीठावर त्यांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी उपस्थित होते. विजयाम्मा म्हणाल्या की, ‘‘ तेलंगणमधील जनतेसाठी वायएस राजशेखर रेड्डी यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी शर्मिला एकाकी झुंज देते आहे. मी तिच्या बाजूने उभी राहिल्याने विनाकारण चर्चेला उधाण आले आहे, त्यामुळेच मी आता वायएसआर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले नाही तर माझ्याच मनात अपराधीपणाची भावना दाटून येईल. .’’
म्हणून पक्ष सोडला
‘‘ पाणीवाटपावरून दोन्ही राज्यांमध्ये असलेला वाद मला चांगलाच ठावूक आहे. येथे दोन्ही पक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. प्रत्येकजण आपआपल्या राज्यातील जनतेचा विचार करतो आहे. अशा स्थितीमध्ये दोन्ही पक्षांसोबत मी उभे राहणे योग्य ठरणार नाही.’’ असेही विजयाम्मा यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.