Telangana Police : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बहीण शर्मिला रेड्डींना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

शर्मिला यांचं उपोषण सुरु राहिलं तर त्यांची किडनी निकामी होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय.
Telangana Police arrested Sharmila Reddy
Telangana Police arrested Sharmila Reddyesakal
Updated on
Summary

शर्मिला यांचं उपोषण सुरु राहिलं तर त्यांची किडनी निकामी होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय.

Telangana Police Arrested Sharmila Reddy : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (CM Jagan Mohan Reddy) यांची बहीण आणि YSRTP पक्षाच्या प्रमुख शर्मिला रेड्डी यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. तेलंगणा पोलिसांनी (Telangana Police) त्यांना अटक करून अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल केलं.

टीआरएस सरकारच्या विरोधात त्यांनी बेमुदत उपोषण पुकारलं आहे. तेलंगणाच्या टीआरएस सरकारनं (TRS Government) शर्मिला (Sharmila Reddy) यांना प्रजाप्रस्थानम पदयात्रेला परवानगी दिली नाही. याच्या निषेधार्थ शर्मिला यांनी शुक्रवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. शुक्रवारपासून त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. त्यामुळं त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावली. शर्मिला यांचा रक्तदाब आणि शरीरातील ग्लुकोजची पातळी अत्यंत चिंताजनक असल्याचं अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Telangana Police arrested Sharmila Reddy
Lakhimpur Tikunia Case : मुख्य साक्षीदाराच्या धाकट्या भावावरच तलवारीनं प्राणघातक हल्ला; मंत्र्याच्या मुलावर आरोप

शर्मिला यांचं उपोषण सुरु राहिलं तर त्यांची किडनी निकामी होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय. टीआरएस सरकारच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांना पहाटे हैदराबादमधील स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलंय. शर्मिला रेड्डींनी तेलंगणामध्ये केसीआर यांच्या पक्षाविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांच्या सरकारविरोधातील मोर्चाला मान्यता मिळालेली नाही. याच्या निषेधार्थ शर्मिला यांनी पक्ष कार्यालयातच बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.