आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी राज्यातील नागरिकांना अधिक मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला आहे. नायडू यांनी सांगितले की, राज्यात वाढत चाललेल्या वयोवृद्ध लोकांच्या संख्येमुळे हा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकार लोकसंख्या व्यवस्थापनाच्या धोरणावर काम करत आहे आणि यासाठी एक विधेयक आणण्याचा विचार केला जात आहे. या विधेयकात अधिक मुलं असलेल्या कुटुंबांना सवलती आणि प्रोत्साहन देण्याची तरतूद असू शकते, नुकत्याच झालेल्या एका सभेत त्यांनी सांगितले.